Next
‘सूर्यदत्ता’तर्फे फॅशन शोचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, January 03, 2018 | 04:42 PM
15 0 0
Share this article:

पुणे : सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे येथे नुकतेच ‘ला क्लास ॲन्युअल रनवे फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले. ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’च्या बावधन कॅम्पसमध्ये रंजक वातावरणात हा कार्यक्रम झाला.

प्रमुख पाहुणे रवी चौधरी व ‘सूर्यदत्ता’चे अध्यक्ष डॉ. प्रा. संजय चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी अधिक संधी कशा निर्माण कराव्यात, यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालक संदीप धर्मा यांनी विद्यार्थ्यांची मेहनत, उत्साह व कल्पकतेचे कौतुक केले. या कार्यक्रमाला फॅशन उद्योगातील तज्ज्ञ, डिझायनर्स, प्रायोजक व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

या फॅशन शोच्या ‘न्यू स्टाईल इनोव्हेशन’ या टॅगलाईनमधून ‘आर्किटेक्चर’, ‘बायो-मिमिक’ व ‘सिंथेसिस’ या तीन मध्यवर्ती संकल्पना प्रतित होत होत्या. ‘आर्किटेक्चर’ या संकल्पनेअंतर्गत चार गटांनी मॉस्को चर्च, सेंट पीटर्सबर्ग मॉस्क, मून टॉवर, हवामहल अशा विविध इमारतींचा संदर्भ देत वास्तुविद्या, बांधकाम व वास्तुविद्येत वापरल्या जाणाऱ्या रेषा असे विविध पैलू प्रदर्शित केले.

‘बायो-मिमिक’ संकल्पनेअंतर्गत तीन गटांनी त्यांच्या रचनांतून निसर्गाचा आविष्कार घडवला. या गटांनी आकाशगंगा, महास्फोट आणि अनोख्या फुलांसह लता-वेली अशा विविध संकल्पनांवर काम केले. ‘सिंथेसिस’ म्हणजे दोन विरोधी घटक अथवा तत्त्वांचा समन्वय साधून त्यातून जोडलेले पूर्णत्व साकारणे. येथे विद्यार्थ्यांनी आग-बर्फ, निसर्ग-यंत्रसामग्री, मुलायम-कठीण अशा विरोधी तत्त्वांचा वापर करून कपडे डिझाइन केले.

विद्यार्थ्यांची ही कल्पकता व अभिनवता यामुळे उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. कापड विकास, भरतकाम, डिजिटल प्रिंटिंग व कापडाखेरीज अन्य प्रकारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सर्वोत्तम संग्रहासाठीचे ‘आर्किटेक्चर – सेंट पीटर्सबर्ग मॉस्क’ या संकल्पनेला पहिले पारितोषिक देण्यात आले. विविध सर्वोत्तम डिझायनर्स व उपविजेत्यांनाही बक्षीसे देऊन गौरवण्यात आले. परीक्षक मंडळात निधी भंडारी, भारती बेरी व संजय भंडारी यांचा समावेश होता.

या वेळी ‘सूर्यदत्ता एज्युकेशन’च्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया म्हणाल्या, ‘आमच्या फॅशन डिझाईन अभ्यासक्रमाचे विद्यार्थी भारताच्या विविध भागांतील असून, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांत आत्मविश्वास, उद्योजकीय कौशल्ये व परिश्रम क्षमता विकसित करण्यासाठी असे अनोखे कल्पक व अभिनव कार्यक्रम आयोजित करून त्याद्वारे त्यांना बुद्धिमत्ता व सुप्त सामर्थ्य प्रदर्शित करण्याची संधी देतोच, शिवाय विविध उपक्रमांच्या माध्यमातून वर्षभर मूल्यवर्धनही घडवतो.’

सखोल संशोधन, कल्पना निर्मिती, रचना व विविध पोशाख निर्मिती, सांघिक कार्य, मूल्यनिश्चिती, वेळ व्यवस्थापन, खरेदी, सामग्री व्यवस्थापन, मालवाहतूक, नामवंत पाहुणे व कार्यक्रमाचे व्यवस्थापन, प्रसाधन, निधी उभारणी, आतिथ्य व्यवस्थापन करण्याची संधी दिल्याबद्दल; तसेच अशा कार्यक्रमांद्वारे जीवनात यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास व एकंदर व्यावसायिक कौशल्यसंच विकसित करण्यासाठीची परिश्रम क्षमता वृद्धिंगत केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी या वेळी संस्थेचे कर्मचारी, शिक्षक व व्यवस्थापनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search