Next
तिसऱ्या ‘कॉर्पोरेट कार्निव्हल’ला सुरुवात
प्रेस रिलीज
Monday, April 09, 2018 | 02:12 PM
15 0 0
Share this storyपुणे : कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे मोठमोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमधील प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर उभे ठाकले आहेत. कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना  वैयक्तिक आणि सांघिक खेळांमधील आपल्या कौशल्याची चुणूक दाखवण्याची संधी देणाऱ्या ‘कॉर्पोरेट कार्निव्हल’ या उपक्रमास विशालनगर येथील चोंधे पाटील स्पोर्ट्स काँप्लेक्स येथे नुकतीच सुरुवात झाली. पुण्यातील तब्बल १०० कंपन्या या कार्निव्हलमध्ये सहभागी झाल्या आहेत.       

फेअर सेन्स स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि ट्विडल डिझायनोग्राफी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात असून, त्याचे हे तिसरे वर्ष आहे. टीसीएस, अॅसेंचर, कॉग्निझंट, कॅप जेमिनी, बजाज ऑटो, केपीआयटी, विप्रो, एचएसबीसी, मायक्रोसॉफ्ट, टेक महिंद्रा यांसह इतरही मोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा या कार्निव्हलमध्ये सहभाग आहे.

एप्रिलमध्ये सलग तीन आठवडे दर शनिवारी व रविवारी हे सामने होणार आहेत. कॅरम, टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, बॉक्स क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉल या खेळांबरोबरच स्पर्धकांना गायन स्पर्धेतही आपले कौशल्य आजमावता येणार आहे. यापैकी सात एप्रिलला फुटबॉल, टेबल टेनिस, बुद्धिबळ आणि बॅडमिंटनचे सामने रंगले, तर आठ एप्रिलला या खेळांबरोबरच गायन स्पर्धेची प्राथमिक रंगली.

या कार्निव्हलमधील सर्व स्पर्धांमध्ये मिळून सर्वाधिक गुणांची कमाई करणाऱ्या कंपनीस ‘कॉर्पोरेट ट्रॉफी’ प्रदान करून गौरवण्यात येणार आहे, तर स्पर्धांसाठी सर्वाधिक स्पर्धक उतरवणाऱ्या कंपनी ‘अॅक्टिव्ह एम्प्लॉयर अॅवॉर्ड’साठी पात्र ठरणार आहे. याबरोबर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या उपक्रमास पीएनबी हाउसिंग फायनान्स, कोलते-पाटील डेव्हलपर्स, ह्युंदाई यांचे साहाय्य लाभले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link