Next
ज्युदो आंतरराष्ट्रीय परीक्षेत योगेश धाडवे यांचे यश
प्रेस रिलीज
Tuesday, May 22 | 11:39 AM
15 0 0
Share this story

योगेश धाडवेपुणे : नुकत्याच लेबनॉन येथे झालेल्या ज्युदो ऑफ एशिया आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत योगेश धाडवे उत्तीर्ण होत त्यांनी यश मिळवले.

धाडवे हे भारतातील पहिले राष्ट्रकुल रौप्यपदक विजेते ज्युदोपटू असून, त्यांनी हाँगकाँग येथे झालेल्या आठव्या कॅडेड व १५ व्या ज्युनियर आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या ते आयकर खात्यात आयकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

या परीक्षेत आशिया खंडातील २४ पंच उत्तीर्ण झाले असून, भारतातून योगेश धाडवे, संजय गिरी (उत्तर प्रदेश) व पौर्णिमा बिसवे (मध्यप्रदेश) यांचा सामावेश आहे. योगेश यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार १९९२-९३ साली मिळाला आहे. महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले, सचिव दत्ता आफळे, सतीश पहाडे, शैलेश टिळक, तसेच जिल्हा संघटनेचे अध्यक्ष महेश मते व सह-सचिव दीपक होले यांचे मार्गदर्शन लाभले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link