Next
‘आयडिया’ची ‘मॅजिक कॅशबॅक ऑफर’
प्रेस रिलीज
Wednesday, January 24, 2018 | 02:47 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतामध्ये डिजिटल व्यवहारांचा प्रवाह रूढ करण्याशी असलेल्या आपल्या बांधिलकीला अनुसरत आयडिया सेल्युलर या भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीने विविध ऑनलाइन तसेच डिजिटल माध्यमांतून रिचार्ज करणार्‍या ग्राहकांसाठी खास ‘मॅजिक कॅशबॅक ऑफर’ घोषित केली आहे.

३९८ रुपये किंवा त्यावरील रकमेच्या कोणत्याही अनलिमिटेड प्लानचे ऑनलाइन रिचार्ज केल्यास आयडियाच्या ग्राहकांना प्रत्येकी ५० रुपयांची आठ डिस्काउंट व्हाउचर्स मिळणार आहेत. त्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत केलेल्या ३०० किंवा त्यावरील रकमेच्या रिचार्जेससाठी ग्राहकांना ही व्हाउचर्स सवलतीमध्ये रूपांतरित करता येतील.

त्याचबरोबर ग्राहकांना दोन हजार ७०० रुपये किंमतीची खरेदी कुपनेही मिळणार असून, कंपनीच्या पार्टनर स्टोअर्स किंवा वेबसाइट्सवरून विविध ब्रँड्सच्या वस्तू विकत घेण्यासाठी ही कुपने वापरता येतील. माय आयडिया अ‍ॅप किंवा आयडिया वेबसाइटवरून रिचार्ज करणार्‍या ग्राहकांना २०० रुपयांपर्यंतचे वॉलेट कॅशबॅकही मिळणार आहे.

आयडियाच्या ३९८ रुपयांच्या रिचार्जमध्ये ७० दिवसांच्या कालावधीसाठी स्थानिक, एसटीडी आणि नॅशनल रोमिंग कॉल्ससह अमर्याद व्हॉइस कॉल्स, प्रतीदिवस एक जीबी डेटा व १०० एसएमएस अशा सुविधा देण्यात येतात.

याबद्दल बोलताना आयडिया सेल्युलरचे डिजिटल हेड सुनील तोलानी म्हणाले, ‘ग्राहकांना आनंद देण्यासाठी ‘मॅजिक’ ही संकल्पना आयडियाने काही वर्षांपूर्वी प्रथम अंमलात आणली. याच संकल्पनेचा ‘मॅजिक कॅशबॅक’ नावाने आता ऑनलाइन माध्यमापर्यंत विस्तार करताना आम्हाला आनंद होत आहे. या योजनेअंतर्गत तीन हजार ३०० रुपयांपर्यंतच्या मोठ्या सवलती दिल्या जाणार आहेत. एक भरीव आणि उत्साहवर्धक प्रस्ताव आमच्या डिजिटल ग्राहकांसमोर ठेवणार्‍या या योजनेची आखणी टेलिकॉम आणि डिजिटल क्षेत्राच्या सखोल अभ्यासाच्या आधारे करण्यात आली आहे. इतर विभागामध्येही अशाप्रकारच्या प्रोत्साहनपर टेलिकॉम सवलती देऊ करत आम्ही आमच्या ग्राहकांना अधिकाधिक समाधान देण्याचा प्रयत्न करत आहोत.’

नवी मॅजिक कॅशबॅक ऑफर आयडियाच्या सर्व प्री-पेड ग्राहकांसाठी १० फेब्रुवारी २०१८पर्यंत लागू असणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search