Next
‘आयरोबोट’द्वारे ‘रुम्बा ई५’ रोबो व्हॅक्यूमची घोषणा
प्रेस रिलीज
Thursday, September 27, 2018 | 02:04 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : कन्झ्युमर रोबो क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘आयरोबोट’ने ‘रुम्बा ई५’ रोबो व्हॅक्यूमच्या आगामी सादरीकरणाची घोषणा केली आहे. वाय-फायशी जोडलेले ‘रुम्बा ई५’ रोबो व्हॅक्यूम उत्पादन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, आपल्या दमदार कामगिरी आणि जबरदस्त पिकअपसह माफक किंमतीत ग्राहकांना घर साफ ठेवण्याचा सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देते.

‘रुम्बा ई५’ रोबो व्हॅक्यूममध्ये दमदार पिकअप टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे तो दररोज सहजपणे फरशी स्वच्छ करू शकतो. प्रीमियम थ्री टप्पा निंग सिस्टमसह त्याची सुरुवात होते ज्यात मल्टी-सरफेस रबर ब्रश, पाचपट एअर पॉवर असलेले पॉवर-लिफ्टिंग सक्शन आणि एक हाय एफिशन्सी फिल्टर असते. ज्यामुळे तुम्हाला दिसणारा कचरा आणि घरातील पाळीव कुत्र्याचे केस, तसेच तुमच्या डोळ्यांना न दिसणारी घाण स्वच्छ होते. खास तयार केलेला एज-स्वीपिंग ब्रश कडांना आणि कोपऱ्यात साचलेल्या घाणही स्वच्छ करते. स्मार्ट नेव्हीगेशन आणि डर्ट डिटेक्ट टेक्नॉलॉजी एकत्रितपणे काम करून फरशी आणि स्वच्छतेची जास्त गरज असलेल्या भागात सफाई करतात.

‘रुम्बा ई५’ रोबो सफाई करून झाल्यानंतर आपणहून जागेवर परततो आणि रिचार्ज होतो त्यामुळे तो केव्हाही कामासाठी सज्ज असतो. याव्यतिरिक्त ‘रुम्बा ई५’ वाय-फाय कनेक्टिव्हिटीमुळे आयरोबोट होम अॅपद्वारे सफाईचे वेळापत्रक बनवणे हे अत्यंत सुलभ झाले आहे. ‘रुम्बा ई५’ प्योरसाइट सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड या आयरोबोट उत्पादनांच्या भारतातील अधिकृत वितरकांद्वारे उपलब्ध असेल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search