Next
‘होंडा’तर्फे तीन दुचाकींच्या नवीन आवृत्त्या बाजारात
प्रेस रिलीज
Saturday, March 17, 2018 | 06:37 PM
15 0 0
Share this story

गुरगांव (हरियाणा) : होंडा मोटारसायकल अॅंड स्कूटर इंडिया प्रा. लि.तर्फे गेल्या महिन्यातील ‘ऑटो एक्स्पो २०१८’ या प्रदर्शनात ‘सीबी शाइन एसपी’, ‘लिव्हो’ आणि ‘ड्रीम युग’च्या २०१८ मधील आवृत्त्या सादर करण्यात आल्या. या नवीन आवृत्त्यांमध्ये उत्कृष्ट स्टाइल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
 
‘होंडा’च्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘ड्रीम युग, लिव्हो आणि सीबी शाइन एसपी या तीनही मोटारसायकलनी वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्राहकांना आकर्षित केले आहे. विशेष म्हणजे यापैकी काही ग्राहक जुनेजाणते असून, काही ग्राहक नव्याने मोटारसायकल चालवणारे आहेत. तसेच ११० सीसी, १२५ सीसी क्षमतेच्या गाड्या चालवणाऱ्यांनीही या तीन मोटारसायकल्सना पसंती दर्शवली आहे. २०१८मधील या नवीन आवृत्त्या आपल्या नवीन स्टायलिंग, कमी मेन्टेनन्स, ‘एचइटी’ टायर्सच्या अधिक ‘मायलेज’मुळे आणखी ग्राहकांना आकर्षित करतील.’
 
‘सीबी शाइन एसपी’चा लुक सर्वांना आकर्षित करणारा आहे. या मोटारसायकलचा टॅंक उत्तम असून स्पोर्टी लुकसाठी न्यू स्पोर्टी ग्राफिक्स वापरण्यात आले आहे. सर्व्हिस ड्यू इंडिकेटर, घड्याळ आणि नवीन कमी मेन्टेनन्स सील चेन आदी या मोटारसायकलची वैशिष्ट्ये आहेत. ही मोटारसायकल पर्ल सिरेन ब्ल्यू, जेनी ग्रे मेटॅलिक, काळा, अॅथलेटिक निळा मेटॅलिक आणि इम्पिरियल लाल मेटॅलिक आदी पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. ड्रम, डिस्क आणि सीबीएस ही या मोटारसायकलची तीन रूपे असून, तिचे मूल्य आहे ६२ हजार ३२ रुपये (एक्स शोरुम, दिल्ली).
 
‘लिव्हो’ मोटारसायकल ‘बेस्ट सेलर’ म्हणून गणली गेली आहे. या मोटारसायकलचे आतापर्यंत पाच लाख ९० हजार आनंदी ग्राहक आहेत. आताच्या नवीन अवतारामध्ये ही मोटारसायकल पहिल्यांदाच गाडी चालवणाऱ्या तरुण ग्राहकाला विशेष आकर्षित करणार आहे. २०१८मधील या मोटारसायकलची नवीन आवृत्ती स्टायलिश स्पोर्टी स्ट्राइप्सनी सज्ज आहे. ही मोटारसायकल काळा, अॅथलेटिक निळा मेटॅलिक, सनसेट तपकिरी मेटॅलिक, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, इम्पिरियल लाल मेटॅलिक आदी पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. ड्रम, डिस्क ही या मोटारसायकलची दोन रूपे असून तिचे मूल्य आहे ५६ हजार २३० रुपये (एक्स शोरुम, दिल्ली).

ड्रीम युगा ही स्टायलिश लुक ११० सीसी मोटारसायकल आता नवीन ग्राफिक्स, आकर्षक मीटर डिझाइन आणि बॉडी कलर्ड आरशांनी सुसज्ज बनली आहे. या मोटारसायकलमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मोटारसायकलची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवीन ‘एचइटी’ टायर तंत्रज्ञान यात वापरण्यात आले आहे.

२०१८च्या आवृत्तीमधील या मोटारसायकलमध्ये लाल-काळा, काळा-लेमन आइस पिवळा, काळा-लाल मेटॅलिक, स्पोर्टस लाल-काळा, काळा-गडद गे मेटॅलिक हे नेहमीचे रंग तर पाहायला मिळतीलच. त्याशिवाय काळा-सनसेट तपकिरी मेटॅलिक या नवीन रंगाचे मॉडेलही उपलब्ध करण्यात आले आहे. या मोटारसायकलचे मूल्य आहे ५२ हजार ७४१ रुपये (एक्स शोरुम, दिल्ली).
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link