Next
पुण्यात पाच जुलैला रंगणार शास्त्रीय नृत्याविष्कार
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनतर्फे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, July 01, 2019 | 04:21 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत मोहिनीअट्टम, भरतनाट्यम, कथ्थकच्या ‘लक्ष्य’ या नृत्याविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाच जुलै  २०१९ रोजी विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात सायंकाळी सहा वाजता होईल, अशी माहिती ‘विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

हा कार्यक्रम शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सहकार्याने होणार आहे. यात ज्येष्ठ नृत्यगुरु मंदाकिनी त्रिवेदी, मोहिनीअट्टम सादर करणार आहेत. श्रुती टेकवडे भरतनाट्यम, तर अमृता गोगटे कथ्थक सादर करणार आहेत.

भारतीय विद्या भवन आणि ‘इन्फोसिस’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा ७८ वा कार्यक्रम असून, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे काकिर्डे यांनी सांगितले.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : पाच जुलै २०१९ 
वेळ : सायंकाळी सहा वाजता 
स्थळ : भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search