Next
शासन शब्दकोशाचे ‘मोबाइल अॅप’
BOI
Tuesday, March 27, 2018 | 04:18 PM
15 0 0
Share this story

मुंबई : शासकीय कार्यपद्धतीत होणारा तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता भाषा संचालनालयाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय देणारे एक विशेष ‘मोबाइल अॅप’ तयार केले आहे. तंत्रज्ञानाचा हात धरून पुढे जात असताना मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला जावा, हे यामागील विशेष उद्दिष्ट असल्याचे भाषा संचालनालयाचे भाषा संचालक हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले आहे.

‘शासन शब्दकोश : भाग १’ असे या अॅपचे नाव असून, यामध्ये ७२ हजारांहून अधिक इंग्रजी शब्दांना योग्य व सोपा मराठी पर्याय देण्यात आला आहे. सरकारी कामांसंदर्भातील, तसेच कायदाविषयक इंग्रजी शब्दांना सोपे मराठी पर्यायी शब्द शोधण्यासाठी या ‘मोबाइल अॅप’चा विशेष उपयोग होणार आहे. इंग्रजी शब्दांचा मराठी अर्थ व मराठी शब्दांचा इंग्रजी अर्थ असे दोन्ही पर्याय यात देण्यात आले आहेत.  

खरे पाहता भाषा संचालनालयाने यापूर्वीच प्रशासन वाक्यप्रयोग (ऑक्टोबर १९६४), शासन व्यवहार कोश (मे १९७३), कार्यदर्शिका (१९८१) व न्यायव्यवहार कोश (ऑगस्ट २००८) असे कोश प्रकाशित केले आहेत. शासकीय व्यवहारात मराठी रुजवण्याचे काम यामुळे सुरू झाले. त्यामध्ये काळानुसार आणि गरजेनुसार वेळोवेळी बदलही करण्यात आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना मराठीचा अधिकाधिक वापर करता यावा या उद्देशाने या ‘शासन शब्दकोश : भाग १’ या अॅपमध्ये निवडक शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. ‘नव्या मोबाइल अॅपद्वारे सरकारी शब्दांना नवे पर्यायी शब्द देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच यामध्ये वेळोवेळी सुधारणाही केल्या जातील. हे मोबाइल अॅप आणखी वापरण्यास सोयीचे होण्यासाठी त्यावर काम सुरू आहे,’  अशी माहिती जाधव यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली.

या मोबाइल अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये मराठी-इंग्रजी शब्दांबरोबरच केंद्र व राज्य सरकारचे ७५० अधिनियमही समाविष्ट करण्यात आले आहेत. हे अधिनियम पीडीएफ फाइल स्वरूपात मराठीत उपलब्ध असून, ती डाउनलोड करण्याचा पर्यायही सोबत देण्यात आला आहे. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालये यांबरोबरच इतर सर्व शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना, तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही या मोबाइल अॅपचा उपयोग होणार आहे. 

(हे अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link