Next
जवान चंदू चव्हाणांवरील पुस्तकाचे लवकरच प्रकाशन
प्रेस रिलीज
Thursday, December 20, 2018 | 12:03 PM
15 0 0
Share this story

जवान चंदू चव्हाण यांच्यावर प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचे मुखपृष्ठपुणे : पत्रकार संतोष धायबर यांनी भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्यावर लिहिलेले पुस्तक लवकरच प्रकाशन होणार आहे. हे पुस्तक जवान चंदू चव्हाण यांच्यावर पाकिस्तानमधील अंधाऱ्या कोठडीत झालेल्या छळावर आधारीत आहे.

चव्हाण यांना पाकिस्तानने २९ सप्टेंबर २०१६ रोजी म्हणजे सर्जिकल स्ट्राइक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच पकडले. पाकिस्तानने त्यांची रवानगी अंधाऱ्या कोठडीत केल्यानंतर अनन्वीत छळ केला; परंतु त्यांनी निधड्या छातीने तो छळ सहन केला. समोर मृत्यू व बेदम मारहाण होत असतानाही ते ‘भारत माता की जय’ म्हणून सामोरे जात होते. हा छळ तब्बल तीन महिने २१ दिवस सुरू होता. अखेर २१ जानेवारी २०१७ रोजी त्या नरकयातनांमधून त्यांची सुटका झाली.

चव्हाण पाकिस्तानमध्ये कसे गेले, त्यांच्यावर कशाप्रकारे छळ झाला, मारहाण व समोर मृत्यू दिसत असतानाही ते निधड्या छातीने कसे सामोरे जात होते, काळ्या कोठडीमधील भिंतीशी ते काय बोलत होते, देवाकडे त्यांचे काय मागणे होते, चव्हाण यांना पकडल्यानंतर भाऊ व जवान भूषण चव्हाण यांची काय अवस्था झाली, आजीचा कसा मृत्यू झाला, चंदू यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने कशा प्रकारचे प्रयत्न केले, याबद्दलची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली असून, यांसह अन्य सविस्तर माहिती पुस्तकात कथन करण्यात आली आहे.

चव्हाण यांचे बालपण, लष्करातील भरतीसह पाकिस्तानमध्ये झालेला छळावर आधारीत सविस्तर माहिती पुस्तकामध्ये आहे. पुस्तकासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांची प्रस्तावना आहे. मराठी व हिंदी भाषेत हे पुस्तक प्रकाशित केले जाणार असून, लवकरच ते इंग्रजी आवृत्तीमध्येही येणार आहे. पुणे येथील ईश्वरी प्रकाशन पुस्तक प्रकाशित करत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link