Next
‘मिया बाय तनिष्क’तर्फे दागिन्यांवर ऑफर
प्रेस रिलीज
Saturday, July 14, 2018 | 04:05 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अलंकार ब्रॅंण्ड्सपैकी एक असलेल्या ‘मिया बाय तनिष्क’ने आपल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांवर ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. सात जुलैपासून सुरू झालेल्या या ऑफरमुळे देशभरातील ग्राहक ‘मिया’च्या वैविध्यपूर्ण दागिन्यांच्या कलेक्शन्सवर २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळवू शकतील.

ही ऑफर स्टॅंडअलोन ‘मिया बाय तनिष्क’ स्टोअर्स, तनिष्क स्टोअरमधील ‘मिया बाय तनिष्क’ बुटिक तसेच शॉपर्स स्टॉपमधील ‘मिया बाय तनिष्क’ आउटलेट्समध्ये उपलब्ध होऊ शकेल. पेंडंट्स, नेकलेसेस, अंगठ्या, कानातले, ब्रेसलेट्स आदी विभागात ‘मिया’ने महिलांसाठी भरपूर वैविध्य उपलब्ध करून दिले आहे.

या ऑफरबद्दल बोलताना ‘मिया’चे व्यवसाय प्रमुख भविष्य केलप्पान म्हणाले, ‘आधुनिक भारतीय स्त्री कायम तिचा स्टाइल कोशंट वाढवण्यासाठी दागिन्यांत गुंतते आणि ‘मिया बाय तनिष्क’ तिच्यासमोर सर्वोत्कृष्ट फॅशनेबल दागिन्यांचे पर्याय ठेवते. म्हणूनच या मोहात पाडणाऱ्या ऑफरच्या माध्यमातून आपले सर्वांत आवडते दागिने खरेदी करणे आम्ही स्त्रियांसाठी खूपच सोपे आणि सोयीस्कर करत आहोत.’

सोने व हिऱ्यांत परिपूर्णतेने घडवलेल्या आधुनिक, ट्रेंडी आणि हलक्या वजनाच्या दागिन्यांसाठी ‘मिया बाय तनिष्क’ हा ब्रॅंड ओळखला जातो. या ब्रॅंडच्या उत्पादनांमध्ये कानातले, अंगठ्या, ब्रेसलेट्स, पेंड्टंस, नेकलेस आदी दागिने तेन हजार ९९९ रुपये किंमतींपासून उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link