Next
थ्री एम इंडियाचा शंभर टक्के सुरक्षा पालन वर्तनावर भर
प्रेस रिलीज
Thursday, March 22, 2018 | 12:28 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा महिन्याच्या निमित्ताने, ‘थ्री एम इंडिया’ने १९ मार्च रोजी मुंबईत ‘इंडिया फार्मास्युटिकल अॅडव्हायजरी काउन्सिल’च्या (आयपीएसी) तिसऱ्या पर्वाचे आयोजन केले होते. दैनंदिन सुरक्षा आव्हानांबद्दल शिक्षित करणे, त्यावर भर देणे आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चिबत करणे, हे या परिषदेचे उद्दीष्ट होते. 

‘मूव्हिंग टूवर्डस् हंड्रेड सेफ्टी कॉम्प्लिअन्स बिहेवियर’च्या महत्त्वाबाबत चर्चा करण्यासाठी आयपीएसीने जागतिक/भारतीय तज्ज्ञांना आणि एबॉट, सिप्ला, एम क्युअर, जीएसके, इन्व्हेंटिआ हेल्थकेअर,  मायलॅन,  मायक्रोलॅब्स, युनिकेम आणि झायडस फायझर या व इतर फार्मास्युटिकल भागिदारांना एकत्र आणले होते.

फार्मास्युटिकल उद्योगातील सॉल्व्हंट्समधून म्हणजेच घटक द्रव्यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत बोलताना, ‘पिरामल’चे ग्लोबल ईएचएस हेड भारत लोंढे यांनी इंजिनियरिंग व अॅडमिनिस्ट्रेटिव्ह नियंत्रणांच्या उभारणीकरिता, ते वापरत असलेल्या पद्धती सुचवल्या. तसेच, कामाच्या ठिकाणी आगीचे धोके टाळण्याकरिता अँटी-पीपीईच्या वाढत्या गरजांवरही त्यांनी भर दिला.

कामगारांचे आरोग्य व त्यांच्या सुरक्षेच्या महत्त्वाविषयी बोलताना थ्री एम इंडियाचे वैयक्तिक सुरक्षा विभागाचे विभाग व्यवस्थापक के. नंदकुमार म्हणाले, ‘कर्मचाऱ्यांचे सर्वांगीण आरोग्य व वैयक्तिक सुरक्षा साधन उपायांची गरज, जिकिरीची वाटू लागली आहे.  उद्योग व तंत्रज्ञानांमधील बदलांसह लोकांना त्यांचे कर्मचारी व बिझनेसच्या सुरक्षेसाठी योग्य मार्ग शोधण्याचे कठीण काम पार पाडायचे आहे. वर्षानुवर्षे आमच्या भागिदारांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आम्ही समाधानी आहोत. ते देखील असे मानतात की, सुरक्षित व स्वस्थ वातावरणामुळे उत्पादक कार्यबळ निर्माण होते, ज्यामुळे अधिक चांगल्या संस्थात्मक परफॉर्मन्सची खात्री मिळते. आपल्यासाठी सुरक्षा विज्ञानाचे आत्यंतिक महत्त्व ध्यानात घेत, आम्ही सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनाची योग्य निवड करण्याबाबत शिक्षित करणे व निर्देशित करणे सुरुच ठेवणार आहोत, जेणेकरून कामाच्या ठिकाणी अपघात व धोके कमी होतील.’

फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमधील कर्मचारी आरोग्य व सुरक्षेच्या धोक्यांबाबत रोजच सर्वाधिक असुरक्षित असतात, त्यांना आग, रासायनिक स्फोट/प्रतिक्रिया आणि विषारी घटकद्रव्यांच्या संपर्कात येणे अशा बाबींना सामोरे जावे लागते. काहींवर लगेचच हे परिणाम दिसून येतात. तर, काहींच्या आयुष्यात काही काळाने हे दोष दिसू लागतात. थ्री एम च्या वैयक्तिक सुरक्षा साधनासह कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना होणारी दुखापत व आजार टाळू शकतात. यामुळे कामाच्या ठिकाणी आरोग्यपूर्ण व सुरक्षित वातावरणाची निर्मिती होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search