Next
स्मरणिकेसाठी कोल्हापुरातील पत्रकारितेच्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन
प्रेस रिलीज
Tuesday, July 02, 2019 | 01:00 PM
15 0 0
Share this article:

कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. या स्मरणिकेत पत्रकारिता विभागाचे माजी विद्यार्थी असणारे पत्रकार, सहयोगी प्राध्यापक, विविध क्षेत्रांत सेवा बजावत असलेले अधिकारी आदींनी विभागाविषयी आपल्या भावना किमान ७०० शब्दांत मांडाव्यात,’ असे आवाहन पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉ. निशा पवार यांनी केले आहे. 

१९६८मध्ये विद्यापीठात पत्रकारिता विभाग सुरू झाला. या विभागाने गेल्या ५० वर्षांत अनेक विद्यार्थी घडवले आहेत. विभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त यापूर्वी ‘प्रादेशिक दूरचित्रवाहिन्यांतील महिलांचा सहभाग’ या विषयावर राष्ट्रीय परिषद घेतली. ‘फेक न्यूज’ या विषयावर पत्रकारिता विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परिषद, विविध विषयांवर कार्यशाळा, माजी विद्यार्थी मेळावा आदी उपक्रम राबविले. याचाच पुढचा भाग म्हणून विभागातर्फे सुवर्णमहोत्सवी वाटचालीवर स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. 

या स्मरणिकेसाठी पत्रकारितेच्या माजी विद्यार्थ्यांनी ई-मेल आयडीवर मनोगत पाठवावे. मनोगतासोबत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र द्यावे. ही माहिती हार्ड तसेच सॉफ्ट कॉपीमध्ये द्यायची असून, पत्रकारिता विभागाशी संबंधित छायाचित्रे असल्यास ती उपलब्ध करून द्यावीत; तसेच याची एक प्रत विभागात पाठवावी, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे. 

ई-मेल : journalism@unishivaji.ac.in
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search