Next
चंदनी सुगंध
BOI
Friday, March 23 | 02:02 PM
15 0 0
Share this story

डॉ. बाबासाहेब गुप्ते यांनी प. पू. चिले महाराज यांचा हा चरित्रग्रंथ साकारला आहे. महाराजांनी अत्यंत सोप्या भाषेत व अनुभवावर आधारित गुरुमार्ग भक्तांना दाखवला होता. या मार्गांची ओळख गुप्ते यांनी या ग्रंथातून करून दिली आहे.

चिले महाराजांच्या जीवनातील प्रसंग यात शब्दबद्ध केले आहेतच शिवाय पैजारवाडी, पन्हाळा, जेऊर, कोल्हापूर, नरसोबाची वाडी या परिसरामध्ये त्या काळी महाराजांनी दाखविलेल्या लीला यामध्ये वर्णिल्या आहेत.

विविध भक्तांना महाराजांच्या अलौकिक सामर्थ्यांचे आलेले अनुभव यामध्ये संकलित केले आहेत. जातीभेद, धर्मभेद, योनिभेदापलीकडे जाऊन सर्व जीवांवर अपार प्रेम करणारे महाराज, न झोपता, उन्हातान्हातून, खाचखळग्यातून, न जेवता, न पाणी पिता विश्वाची कामे करत फिरणारे गोरगरीबांकारिता तळमळणारे महाराज या ग्रंथातून भेटतात. ‘जगण्यात मौज आहे’, असा आशेचा किरण ते दाखवतात.

प्रकाशक : नरेंद्र प्रकाशन
पाने : ५६२
किंमत : ६०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link