Next
‘सख्य’ संस्थेचा मनोरंजनात्मक उन्हाळी कँप
BOI
Friday, May 10, 2019 | 03:45 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : येथील ‘सख्य’ महिला मार्गदर्शक केंद्राच्या वतीने मनोरमा नगर वसाहतीतील किशोरवयीन मुलांकरीता नुकतेच उन्हाळी कँपचे आयोजन करण्यात आले.

परीक्षा संपल्यानंतर मुलांना सुट्टीत मौज-मजा करता यावी व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने ‘सख्य’ संस्थेच्या वतीने या उन्हाळी कँपचे आयोजन करण्यात आले होते. सख्य संस्थेच्या मार्गदर्शिका अरुणा सावंत आणि एसएनडीटी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी व वस्ती अॅननिमेटर यांनी या उन्हाळी कँपसाठी सहकार्य केले.

या कँपमध्ये सुरुवातीला खेळाद्वारे मुलांचा परिचय करून घेण्यात आला. नंतर बौद्धिक विकासासाठी एक स्मरणशक्ती खेळ, तर शारीरिक विकासाला चालना देणारा मैदानी खेळही घेण्यात आला. त्यानंतर मुला-मुलींचे गट विभागून, प्रत्येक गटात चार्ट पेपर, कलर पेन असे साहित्य देऊन त्यांना सामाजिक विषयावर चित्र काढण्याचा उपक्रम देण्यात आला. यासाठी विषय देण्यात आले. या चित्रांच्या माध्यमातून मुलांच्या विचारांची ओळख करून घेण्यात आली. या सर्व खेळांमध्ये मुला-मुलींनी उत्साहाने सहभाग नोंदवला. 

हा कँप सिद्धेश्वर शाळेच्या आवारात घेण्यात आला. शाळेच्या सर्व शिक्षकवृंदांनी या वेळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search