Next
‘सेंटा टीचिंग प्रोफेशनल्स ऑलिम्पियाड’ स्पर्धेचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, November 14, 2018 | 02:21 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : रिलायन्स फाउंडेशन आणि सेंटर फॉर टीचर अॅक्रेडिशनशी (सेंटा) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेंटा टीचिंग प्रोफेशनल्स ऑलिम्पियाड’चा (टीपीओ) या वार्षिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे या स्पर्धेचे चौथे वर्ष असून, ही स्पर्धा आठ डिसेंबर २०१८ रोजी देशातील ४६ शहरे आणि दुबईतील अबुधाबी येथे होईल.

‘टीपीओ २०१८’ ही २१ विषयांमध्ये प्रायमरी ते सिनियर सेकंडरीसाठी, मिडल स्कूल आणि सेकंडरी स्कूलसाठी सध्या इंग्रजी माध्यमामध्ये उपलब्ध आहे. याचबरोबर प्रायमरी स्कूल टेस्ट इंग्रजी, हिंदी, कन्नड, मराठी, तमिळ आणि तेलगू माध्यमांमध्ये उपलब्ध होईल. या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत एक हजार विजेत्यांना रिलायन्स फाउंडेशन शिक्षक पुरस्कार जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.

रिलायन्स फाउंडेशनने ‘सेंटा’शी भागीदारी करार केला आहे. ‘सेंटा’ ही भारतस्थित खासगी शिक्षक प्रमाणपत्र संस्था असून, देशात अणि देशाबाहेर शिक्षणाच्या क्षेत्रात विविध संधी निर्माण करणे, पारितोषिके देणे आणि चांगल्या शिक्षणाला मान्यता मिळवून देण्याचे काम ही संस्था करते. रिलायन्स समूहाने शिक्षण क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले आहेत. यात एज्युटेक प्लॅटफॉर्म जिओ एम्बाइब, धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, रिलायन्स फाउंडेशन स्कूल्स, आगामी जिओ युनिव्हर्सिटी आदी उपक्रमांचा समावेश आहे. आता झालेल्या नव्या भागीदारीमुळे रिलायन्स फाउंडेशन या व्यवस्थेत सर्वांत महत्त्वाचा घटक असलेल्या शिक्षकांना पाठबळ देईल.

शिक्षकांना व्यावसायिक विकासाच्या संधी मिळवून देणे आणि ‘सेंटा’च्या ‘टीपीओ’ उपक्रमात सहभाग घेऊन शिक्षण हा प्रेरणादायी व्यवसाय बनवून शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे हा ‘रिलायन्स’च्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे. सध्या देश पातळीवर होणाऱ्या ‘सेंटा’च्या ‘टीपीओ’ला सहकार्य करून ‘रिलायन्स’ या स्पर्धेला पुढील पातळीवर नेत आहे.

या भागीदारीबद्दल बोलताना ईशा अंबानी म्हणाल्या, ‘भारतासमोरील विकासात्मक आव्हानांमध्ये शिक्षणाचा समावेश आहे. या क्षेत्रात नाविन्यपूर्ण शाश्‍वत उपाय शोधण्याला आम्ही मदत करीत आहोत. चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यात शिक्षकांची मध्यवर्ती भूमिका आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये तंत्रज्ञान मोलाची कामगिरी बजावते. आमचे फाउंडेशन देशातील शिक्षकांच्या क्षमता वाढविण्यासाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना सक्षम बनविणार आहे. देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे असून, त्यांना पारितोषिके देऊन सन्मानितही करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आम्ही ‘सेंटा’ ‘टीपाओ’शी भागीदारी केली आहे.’

‘सेंटा’च्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रम्या वेंकटरमन म्हणाल्या, ‘सेंटा ‘टीपीओ’ हा शिक्षकांना उत्तेजन, ओळख आणि पुरस्कार देणारा उपक्रम आहे. यामध्ये नवख्या शिक्षकांसोबत अनुभवी शिक्षक, तसेच प्राचार्य, शिकवणी शिक्षक, बीएडचे विद्यार्थी, संशोधक आणि स्वयंसेवकांना सहभागी होता येईल. खासगी आणि सरकारी शाळा, सर्व बोर्ड्स-सीबीएसई, आयसीएसई, राज्य बोर्ड्स, आयबी, आयजीएसई यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. रिलायन्स फाउंडेशनच्या पाठिंब्यामुळे आणखी शिक्षकांपर्यंत आम्हाला पोचता येईल. यामुळे एकूणच या व्यवसायाचा अभिमान वाढण्यास मदत होईल.’

रिलायन्स फाऊंडेशन आणि ‘सेंटा’तर्फे भविष्यात आणखी उपक्रम एकत्रितपणे राबविले जाणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search