Next
‘एकांश ट्रस्ट’तर्फे फॅशन डिझायनर्ससाठी स्पर्धा
प्रेस रिलीज
Wednesday, April 17, 2019 | 04:38 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील ‘एकांश ट्रस्ट’तर्फे अनोखी डिझायनिंगची कल्पना असणाऱ्या फॅशन डिझायनर्ससाठी ‘अॅड्रेस नाऊ’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारचे कपडे दिसतात. कपड्यांची सतत बदलणारी फॅशन व ट्रेंडस पाहून बऱ्याचदा ते परिधान करण्याचा मोह आवरत नाही; परंतु सर्वसमावेशक समाज म्हणून या कपड्यांचा विचार केल्यास त्यात कोणत्याही प्रकारची अनुकुलता सहसा दिसत नाही. प्रज्ञाचक्षू किंवा दिव्यांग व्यक्तींच्या शरीराची जडणघडण निसर्गाने एका वेगळ्या पद्धतीने केलेली असते, त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे अनुकूल वापराचे कपडे मिळत नाहीत. ही गरज लक्षात घेऊन ‘एकांश’तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत फॅशन डिझायनर्सना त्यांच्याकडे असणाऱ्या अनुकूल कपड्यांसाठीच्या अनोख्या व नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करता येणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त फॅशन डिझायनर्सनी आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

अधिक माहितीसाठी संपर्क : ९५०३७ १५०१५
ई-मेल : Info@ekansh.org
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ekansh Trusr About 68 Days ago
AD-DRESS NOW (www.ekansh.org) Register by 30 April - [ ] Teams: There are 2 team categories 1. Mentor (PwD) + Fashion/Garment design expert 2. Mentor (PwD) + Fashion/Garment design expert + Fashion/Garment design students. No member can be on more than one team. - [ ] Process: A. Design to be submitted first. B. Best designs will be shortlisted for the finale and teams will be informed. C. Short listed teams (only) to tailor the garment which will be presented by the team and modelled on stage by the mentor at the finale in Pune. * Dates are on the website. * EKansh Trust is not responsible for forming teams. **PwD means Persons with Disabilities. (globally accepted term
0
0

Select Language
Share Link
 
Search