Next
विद्यार्थिनी व आशा कार्यकर्त्यांना सायकल वाटप
BOI
Saturday, February 09, 2019 | 01:21 PM
15 0 0
Share this story

पुणे : पुण्यातील ‘टाटा ट्रस्ट’, ‘पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘मेंटर्स फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थिनी आणि आशा कार्यकर्त्यांना मोफत नऊ हजार सायकलींचे वापट करण्यात येणार आहे.

रविवारी (१० फेब्रुवारी) कात्रज येथील शिव गोरक्षक ग्राउंड याठिकाणी दुपारी दोन वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. या वेळी सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय ट्रस्टी आर. व्यंकटरमण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

बारामती, दौंड, इंदापूर, खडकवासला, हवेली, भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर या तालुक्यांमधील शालेय विद्यार्थिनी आणि आशा कार्यकर्त्यांना या सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link