Next
यंग शेफ ऑलिम्पियाड
प्रेस रिलीज
Thursday, February 01 | 01:22 PM
15 0 0
Share this story


पुणे : जगातील सर्वात मोठी पाककृती स्पर्धा असलेल्या ‘यंग शेफ ऑलिम्पियाड’च्या चौथ्या पर्वाच्या पहिल्या फेरीचे मंगळवारी २९ जानेवारी रोजी पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय पाककला स्पर्धेत ५५हून अधिक देशांनी सहभाग घेतला असून, विजेत्यांना ‘वायसीओ चषक’ आणि दहा हजार अमेरिकन डॉलरचे रोख पारितोषिक मिळणार आहे. या स्पर्धेला भारत सरकारच्या पर्यटन विभागाचा पाठिंबा लाभला आहे.

जगभरातील तरुण, प्रशिक्षण घेणाऱ्या शेफ्सना संवादाची, आपली प्रतिभा दाखवण्यासाठी संधी मिळावी; या हेतूने ‘आयआयएचएम’ या नामांकित हॉस्पिटॅलिटी स्कूलने वायसीओचे व्यासपीठ तयार केले आहे. गेल्या तीन पर्वांना आंतरराष्ट्रीय आतिथ्यशीलता (इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी) उद्योगाकडून उत्तम आणि वाढता प्रतिसाद मिळाल्याने, हा सोहळा जगभरातील आतिथ्यशीलता उद्योगासाठी एक मापदंड झाला आहे.

पुण्यातील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’मध्ये पहिली फेरी पार पडली. या फेरीमध्ये दहा देशांनी सहभाग घेतला होता आणि त्यांना दोन तासांत पाककृतीनुसार पदार्थ (पोच्ड एग फ्लॉरन्टाईन आणि लेमन सुफले) तयार करायचे होते. परीक्षण मंडळामध्ये शेफ कार्ल जोसेफ मॅग्नस गगेनमॉस, शेफ यी चुंग बोरीस लेउंग आणि शेफ व्हिन्सेंटो ऑलिव्हरी आणि पुण्यातील शेफ करण आनंद यांचा समावेश होता.

इजिप्त, दक्षिण कोरिया, केनिया, अर्मेनिया, ग्रीस, तुर्की, नामिबिया, मॉरिशस आणि मॉल्टा येथील स्पर्धकांचे पाककौशल्य, तंत्र, सृदृढ आहारावर दिलेला भर, सुरक्षितता व स्वच्छता, कार्यशैली, किमान अपव्यय आणि घटकांचा उत्तम वापर, व्यावसायिक पेहराव, प्रवृत्ती, पदार्थाचे सादरीकरण, चव आणि स्वाद या निकषांवर परीक्षण करण्यात आले.

आयआयएचएम पुणे या संस्थेचे संचालक रुपिंदर सिंग खुराना म्हणाले, ‘ही स्पर्धा आयोजित करताना आयआयएचएम पुणे या संस्थेला अत्यंत आनंद झाला. यंग शेफ ऑलिम्पियाड या उत्तम व्यासपीठाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाण्याची, शिकण्याची आणि वैचारिक देवाणघेवाण करण्याची उत्तम संधी सगळ्यांना लाभली. जगभरातील उदयोन्मुख गुणवतांनी एकत्र येऊन, एक मैत्रीपूर्ण गट स्थापन केला आणि त्यांनी एकमेकांशी स्पर्धा केली हे पाहणे अत्यंत उद्बोधक होते. पुढील फेरीसाठी मी त्या सर्वांना शुभेच्छा देतो.’

यानिमित्त वायसीओतर्फे पुण्यातील ‘वेस्टइन’ येथे २९ जानेवारी रोजी वैशिष्ट्यपूर्ण असे ‘इंटरनॅशनल कलिनरी फोरम’ (आंतरराष्ट्रीय पाककला फोरम) आयोजित करण्यात आले होते. या फोरममध्ये जगभरातील व पुण्यातील प्रसिद्ध शेफ आणि मार्गदर्शक सहभागी झाले होते. या फोरममध्ये दोन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादांमध्ये या क्षेत्रातील विविध समस्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठीच्या संभाव्य उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link