Next
‘अपलोडफुडी’च्या पथदर्शी प्रकल्पाचे पुण्यात अनावरण
प्रेस रिलीज
Monday, April 30, 2018 | 03:43 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘अपलोड फुडी’ या फूड अँड बेव्हरेजेस उद्योगाला अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत सेवा देणाऱ्या कंपनीने एक सुलभ रेस्टॉरंट व्यवस्थापन सेवा दाखल केली आहे.

ही कंपनी व्हाइट लेबल्ड सोल्यूशन्स पुरवठादारांसाठी एक वेगळी वर्गवारी तयार करत असून, यांना एक खास बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू ग्राहक  सेवा दिली जाईल. ज्यात ऑर्डर व्यवस्थापन, ग्राहकांचे समाधान तपासले जाईल. एचआरचे कार्य (उपस्थिती, मॉनिटरिंग आणि पे रोल) ऑटोमेटेड होईल. इन्व्हेंटरी आणि बॅकएंड व्यवस्थापनासाठीही सहकार्य होईल. या कंपनीने पुण्यामध्ये आपले काम सुरू केले असून, शहरातील २० आघाडीच्या  रेस्टॉरंट्समध्ये ही सुविधा देत आहेत.
 
अद्ययावत अॅनालिटिक्सच्या वापराद्वारे ते रिसोर्स ऑप्टिमायझेशनद्वारे ही सुविधा वापरली जाते. एफअॅण्डबी आऊटलेट्सना ग्राहकांची संख्या आणि समाधान वाढवण्यास मदत होईल. त्यामुळे महसूल वाढीचे फायदे मिळतील. पुढील सहा महिन्यांत महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील शहरांमध्ये तीन हजार पेक्षा अधिक रेस्टॉरंट्सपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
 
अपलोडफुडीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक योगेश घोरपडे म्हणाले, ‘आमच्या वीस भागीदार रेस्टॉरंट्सच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या पुण्यातील पहिल्या प्रोजेक्टबद्दल आम्हाला आनंद आहे. संपूर्ण शहरात एफअँडबी उद्योग वेगाने बदलू लागला आहे. ग्राहकांच्या त्यांच्या आवडत्या रेस्तराँमधील आवडी, अपेक्षा आणि गरजा वेगवेगळ्या आहेत. खाद्यपदार्थ बनवणे, टेकअवे, डिलिव्हिरीची वेळ आणि कार्यक्षमता हे ग्राहकांचे समाधान ठरवण्यातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. अपलोडफुडीमध्ये आम्ही आमची उपाययोजना  रेस्टॉरंट व्यवस्थापनाचा अत्यंत मौल्यवान स्त्रोत बनवण्यासाठी तयार केली आहे. त्यामुळे त्यांना रेस्टॉरंट जे काही करते ते सर्व चालवणे, व्यवस्थापन करणे आणि मॉनिटर करणे शक्य होईल.’
 
‘व्हाइट लेबल ग्राहक केंद्री अॅप, क्लाऊडवर आधारित ऑर्डर व्यवस्थापन यंत्रणा, शक्तिशाली वेब आणि अॅप मॉनिटरिंग डॅशबोर्ड यांच्यासोबत ते एक सर्वांगीण ऑटोमॅटिक लॉयल्टी इंजिन तयार करते जे निष्ठावान ग्राहकांना फायदे देते. एचआर यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांच्या मॉनिटरिंगचे व्यवस्थापन करण्याबरोबरच, ते वापरकर्त्यांच्या मागण्यांचाही आणि समाधानाच्या लेव्हलचा अभ्यास करते आणि त्याद्वारे रेस्टॉरंट्सना त्यांच्या ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी डेटा व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती देते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search