Next
अल्जेर्नोन ब्लॅकवुड
BOI
Wednesday, March 14, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

आपण लिहिलेल्या भुताखेतांच्या आणि अघोरी कथांनी जगभरच्या अनेक लेखकांना स्फूर्ती देणाऱ्या अल्जेर्नोन ब्लॅकवुडचा १४ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
.......... 
१४ मार्च १८६९ रोजी शुटर्स हिलमध्ये जमलेला अल्जेर्नोन ब्लॅकवुड हा भुताखेतांच्या भारंभार अघोरी कथा लिहिणारा बहुप्रसवा लेखक!

लेखनाकडे वळण्याआधी त्याने बरेच उद्योग करून पाहिले होते – कॅनडामध्ये शेती केली, हॉटेल चालवून बघितलं, अलास्काच्या सोन्याच्या खाणीत काम केलं आणि चक्क वर्तमानपत्रासाठी वार्ताहर म्हणूनही काम केलं; पण शेवटी इंग्लंडला परतून ‘दी एम्प्टी हाउस’ या पहिल्याच पुस्तकाने प्रसिद्धी मिळाल्यावर तो लेखनात रमला. डॉ. जॉन सायलेन्स या अतींद्रिय शक्ती प्राप्त असणाऱ्या डॉक्टरच्या अनेक कथा त्याने लिहिल्या. त्या चांगल्याच गाजल्या.

सुनंद त्र्यंबक जोशी या भयकथा आणि अघोरी कथांच्या अमेरिकास्थित भारतीय समीक्षकाच्या मते, ब्लॅकवुडचा ‘इन्क्रेडिबल अॅडव्हेंचर्स’ हा कथासंग्रह गेल्या शतकातला अतींद्रिय आणि अघोरी कथाप्रकारातला अग्रेसर कथासंग्रह मानता येईल! ब्लॅकवुडच्या अनेक कथांनी अनेक लेखकांना स्फूर्ती दिली आहे. 

दी ह्युमन कॉर्ड, दी वेव्ह, दी प्रॉमिस ऑफ एअर, दी गार्डन ऑफ सर्व्हायव्हल, दी ब्राइट मेसेंजर, दी सेंटॉर यांसारख्या पंधरा कादंबऱ्या, दी लॉस्ट व्हॅली अँड अदर स्टोरीज, डे अँड नाइट स्टोरीज, टंग्ज ऑफ फायर अँड अदर स्केचेस, स्ट्रेंज स्टोरीज, दी डॉल अँड वन अदर, दी डान्स ऑफ डेथ अँड अदर स्टोरीज यांसारखे पस्तीसेक कथासंग्रह आणि याशिवाय बर्ट्रांम फॉरसीथ, व्हायोलेट पर्न, एलेन एन्ली यांसारख्यांबरोबर लिहिलेली सात नाटकं असं भरघोस लेखन त्याने केलं आहे.

१० डिसेंबर १९५१ रोजी त्याचा केंटमध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link