Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची ‘केपीआयटी’ कंपनीत निवड
प्रेस रिलीज
Thursday, May 02, 2019 | 12:10 PM
15 0 0
Share this article:

केपीआयटी टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये निवड झालेले ‘डीकेटीई’चे विद्यार्थी.

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या १३ विद्यार्थ्यांची केपीआयटी टेक्नॉलॉजी या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली आहे. केपीआयटी टेक्नॉलॉजी ही एक सॉफ्टवेअर सोल्युशन, ऊर्जा, दळणवळण क्षेत्रातील जागतिक स्तरावर आग्रेसर कंपनी आहे. 

‘केपीआयटी’मार्फत केपीआयटी स्पार्कल यांच्या ‘एनर्जी अ‍ॅंड मोबीलिटी फॉर फ्युचर’ या संकल्पनेअंतर्गत देशपातळीवरील सुमारे एक हजार १००हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून २२ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामधून उत्कृष्ट ३०० विद्यार्थ्यांची ऑनलाइन टेस्ट घेण्यात आली व मुलाखतीस बोलविण्यात आले. यामध्ये ‘डीकेटीई’च्या १३ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी, विविध संभाषणाद्वारे व गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात आली. 

सध्या इंडस्ट्रीमध्ये ऊर्जाबचतीची गरज वाढली आहे. या बचतीवरील उपाय म्हणून अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी ‘डीकेटीई’मध्ये विविध नामांकित तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन आयोजित केले जाते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच विविध नामांकित कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठविण्यामध्ये ‘डीकेटीई’ ही संस्था नेहमीच आघडीवर आहे. 

या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून ‘डीकेटीई’च्या इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, आयटी व इटीसी, इंजिनीअरिंग विभागातील शुभम पोतदार, विराज पाटील, प्रणव कवठेकर, रोहिनी हेडावू, शिवांजली पाष्टे, सकलेन पटवेगार, अमृता व्हरांबळे, मुकुल कुलकर्णी, स्नेहल गोंधळी, गौरव भोसले, ॠषिकेश शिंदे, शुभांगी देसाई, प्रीती होगाडे यांना ही संधी मिळाली आहे. 

या प्लेसमेंटसाठी संस्थेचे इंजिनीअरिंग विभागाचे टीपीओ प्रा. जी. एस. जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. या विद्यार्थ्यांना डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे.डायरेक्टर डॉ यू. जे. पाटील, डे.डायरेक्टर प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांसह सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search