Next
रत्नागिरीतील कलाकारांच्या चित्र-शिल्पांचे ‘जहांगीर’मध्ये प्रदर्शन
BOI
Monday, December 03, 2018 | 02:24 PM
15 0 0
Share this article:



रत्नागिरी :
मूळचे रत्नागिरीचे असलेले वैभव पांचाळ, तसेच प्रणित घाटे व धीरज डहोळे या तिघा कलाकारांच्या चित्र आणि शिल्पांचे प्रदर्शन चार डिसेंबर २०१८पासून मुंबईतील जहांगीर कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. १० डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना पाहता येईल. 

कलाकारांनी कलात्मक व अनोख्या संकल्पना वापरून बनविलेली विविधांगी चित्रे व शिल्पाकृती, जीवनातील वास्तव व त्यापासून होणारी भावपूर्ण अनुभूती यांचे आगळेवेगळे दर्शन सर्वांना होणार आहे. वैभव पांचाळ यांचे कलाशिक्षण मुंबईतील सर जे. जे. कलाविद्यालयात झाले. त्यादरम्यान चित्रकलेचा विशेष अभ्यास करून त्यांनी त्यात प्रावीण्य मिळविले. नंतर मुंबईतील बजाज कलादालन, जहांगीर कलादालन, रत्नागिरीतील रंगधानी कलादालन आदी ठिकाणी चित्रांचे प्रदर्शन भरवले. व्यक्ती, वस्तू, पर्यावरण यांचे सूक्ष्म आकलन हा वैभव यांच्या चित्रांचा विषय आहे.

विविध बाबींचे होणारे सूक्ष्म आकलन, त्यामधील द्वंद्व, आजूबाजूच्या पर्यावरणाशी असणारा संबंध, परिणाम आणि अनुभव यांचे चित्रण करण्याचा प्रयत्न त्यांनी या चित्रामध्ये केला आहे. विशिष्ट अभ्यासात्मक रंगसंगती, आकार, आकारमान, अवकाश तसेच एका आकारामध्ये अंतर्भूत असलेले विविध आकार या सर्व बाबींची सूक्ष्म अनुभूती या प्रदर्शनातून अनुभवता येणार आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search