Next
‘फोक्सवॅगन’च्या पर्यावरणपूरक प्राथमिक शाळेचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Thursday, June 07 | 10:53 AM
15 0 0
Share this storyपुणे : फोक्सवॅगन इंडियाने फडके-वस्ती, निघोजेमध्ये नवीन प्राथमिक शाळेच्या उद्घाटनाची घोषणा केली. या शाळेच्या माध्यमातून चाकण, पुण्याच्या उद्योन्मुख क्षेत्रातील वाढत्या समुदायांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षण व कौशल्य विकासाप्रती आपल्या सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून फोक्सवॅगन इंडियाने निर्माण केलेली शाळा दरवर्षाला फडके-वस्ती गावातील १२० विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा देईल.

जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे यांच्या हस्ते पाच जून २०१८ रोजी नवीन शाळेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी फोक्सवॅगन इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अँड्रीस लॉर्मन आणि फोक्सवॅगन इंडियाच्या उत्पादन इंजिनीअरिंग व प्लांट इंजिनीअरिंगचे उपाध्यक्ष अँड्रीस जॉन, तसेच फोक्सवॅगन इंडियाच्या एक्स्टर्नल अफेअर्स व सीएसआरचे उपाध्यक्ष पंकज गुप्ता, निघोजेचे सरपंच रमेश गायकवाड उपस्थित होते.

या वेळी बोलताना फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अँड्रीस लॉमन म्हणाले, ‘आम्ही दीर्घकालीन वाढ व विकासावरील फोकससह आमच्या शेजारच्या समुदायांच्या गरजा व आवश्यकता जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा केली. शिक्षण हा विकासासाठी महत्त्वपूर्ण घटक आहे आणि योग्य पायाभूत सुविधा असल्याने मुलांच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मोठा बदल घडून येऊ शकतो. आम्ही समुदायांना स्थिर पद्धतीने मदत करण्याशी कटिबद्ध आहोत आणि भविष्यात देखील ही कामगिरी सुरूच ठेवू.’

नवीन शाळेच्या इमारतीमध्ये दोन मजले आहेत आणि प्राथमिक शाळेतील चार वर्गांसाठी प्रत्येकी एक वर्ग असेल. यापूर्वी दोन वर्ग एकाच खोलीमध्ये बसवले जात होते. फोक्सवॅगन प्लांट इंजिनीअरिंग आर्किटेक्टने नवीन इमारतीची रचना डिझाइन केली आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक विद्यार्थी मावण्यासाठी रचनेमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन इमारतीमध्ये अंतर्गत अभ्यासेतर उपक्रम आणि स्टाफसाठी वेगळ्या खोल्या आहेत. शाळेच्या आवारामध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची सुविधा देण्यासाठी किचन आहे. शाळेमध्‍ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्‍टम व ग्रेवॉटर ट्रीटमेंट सिस्‍टम आहेत, ज्‍यामुळे शाळेच्‍या आवारामध्‍ये कर्दळी व केळ्यांच्या झाडांची लागवड केली जाते.

ही नवीन इमारत ग्रीन बिल्डिंग कौन्सिलतर्फे प्रमाणित असेल आणि इमारतीला सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम प्रमाणन मिळण्याची अपेक्षा आहे.

‘फोक्सवॅगन ग्रुप इंडिया’विषयी :
फोक्सवॅगन ग्रुप भारतात मुख्यत: ऑडी, लँबॉर्गिनी, पोर्शे, स्कोडा आणि फोक्सवॅगन या पाच प्रवासी कार ब्रँड्समुळे ओळखला जातो. स्कोडा या ब्रँडच्या माध्यमातून २००१मध्ये भारतात आलेला फोक्सवॅगन ग्रुप गेल्या १७ वर्षांपासून भारतात आहे. ऑडी आणि फोक्सवॅगन हे ब्रँड भारतात २००७ साली आले, तर पोर्शे आणि लँबॉर्गिनी हे ब्रँड २०१२मध्ये दाखल झाले. यातील प्रत्येक ब्रँडची आपली अशी एक खासियत आहे आणि प्रत्येक ब्रँड बाजारपेठेत एक स्वतंत्र ओळख टिकवून आहे. फोक्सवॅगन ग्रुपचे भारतात सुमारे ३० मॉडेल्स, सुमारे २४० डिलरशीप्स आणि पुणे आणि औरंगाबाद असे दोन प्लांट्स आहेत.

पुण्यातील कारखान्यात दरवर्षी दोन लाख गाड्यांची निर्मिती करण्याची क्षमता आहे (अधिकतम तीन शिफ्टि सिस्टममध्ये) आणि इथे सध्या फोक्सवॅगन पोलो, अमिओ, वेंटो आणि स्कोडा रॅपिड या गाड्यांची निर्मिती केली जाते. भारतात विकल्या जाणाऱ्या ऑडी, स्कोडा आणि फोक्सवॅगनच्या विविध प्रिमिअम आणि लक्झरी गाड्यांचे असेंबलिंग औरंगाबाद प्लांटमध्ये होते. या कारखान्याची क्षमता वर्षाला साधारण ८९ हजार गाड्या इतकी आहे. ऑडी, बेंटली, बुगाटी, ड्युकाती, लँबोर्गिनी, पोर्शे, स्कॅनिया, सीट, स्कोडा, फोक्सवॅगन कमर्शिअल व्हेइकल, मॅन आणि फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स अशा १२ ब्रँड्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या फोक्सवॅगन एजीचा फोक्सवॅगन ग्रुप इंडिया हा एक भाग आहे.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link