Next
२८ ऑगस्टला पंढरपुरात पत्रकारांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा
सोलापूर विद्यापीठ आणि स्वेरी यांचा संयुक्त उपक्रम
BOI
Monday, August 27, 2018 | 03:03 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : ‘पत्रकारिता - काल आज आणि उद्या’ या विषयावर पत्रकारांसाठी २८ ऑगस्ट २०१८ रोजी सोलापुरात राज्यस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे समन्वयक आणि ‘स्वेरी’चे ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

रोंगे म्हणाले, ‘समाजाला ताकद देण्याचे काम पत्रकार अहोरात्र करत आहेत, ही बाब खरोखरच अभिनंदनीय आहे. लोकशाही देशात पत्रकारितेला ‘चौथा स्तंभ’ म्हणून गौरविले जाते. समाज परिवर्तनात तो मोलाची कामगिरी बजावत आहे. म्हणून आम्ही येणाऱ्या काळात पत्रकार अधिक अपडेट राहावेत, म्हणून त्यांच्यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.’

पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) आणि सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वेरी’मध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ‘स्वेरी’चे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी सोलापूर विद्यापीठाच्या निवडणुकीत विजय मिळविल्यामुळे पत्रकारांच्या वतीने पत्रकार अभिराज उबाळे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव या वेळी मांडला. पत्रकार अभय जोशी यांच्या हस्ते डॉ. रोंगे यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार परिषदेला उपप्राचार्य प्रा. एस. एन. कुलकर्णी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

प्रास्ताविकात डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले, ‘समाजाला सामर्थ्य देण्याचे काम पंढरपुरात अनादी काळापासून चालत आले आहे. ‘जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर’ असे म्हटले जाते. त्याच उद्देशाने पंढरपूर नगरीच्या कुशीत गोपाळपूरच्या माळरानावर स्वेरी या संस्थेने सन १९९८मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाचे लहानसे रोपटे लावले. आज हा परिसर आपल्या सर्वांच्या योगदानामुळे बहरलेला दिसतो आहे. ‘एनबीए’, ‘नॅक’ आदींची मानांकने संस्थेला प्राप्त होत आहेत. ‘स्वेरी’ने गुणवत्तेमध्ये भरारी घेतल्याचे आपण पाहत आहोतच. संपूर्ण महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी शिक्षणाची सध्याची अवस्था पाहता ‘स्वेरी’ने मिळविलेले यश हे निश्चितच स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.’ 

‘पत्रकारांसाठी पंढरपुरात कार्यशाळा व्हावी, हे पत्रकारांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास जात असून, या कार्यशाळेसाठी आवश्यक ती मदत करू,’ अशी ग्वाही पत्रकार संकेत कुलकर्णी यांनी दिली.

कार्यशाळेबद्दल :       
२८ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ९.३० ते १०.०० या वेळेत नावनोंदणी व अल्पोपहार झाल्यानंतर ठीक १० वाजता सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. या वेळी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि सोलापूर विद्यापीठा मधील ‘पत्रकारिता आणि जनसंज्ञापन’ विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर लगेचच कार्यशाळेची सत्रे सुरू होणार आहेत. दुपारी १.०० ते १.३० दरम्यान भोजन असेल. सत्रांनंतर कार्यशाळेत मार्गदर्शन झालेल्या विषयावर खुली चर्चा होणार आहे. समारोप प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे अध्यक्षस्थानी असतील, तर ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यानंतर कार्यशाळेतील सहभागाचे प्रमाणपत्र सर्वांना दिले जाईल. 

पहिले सत्र : वृत्तवाहिन्यांचे महत्त्व आणि मर्यादा
मार्गदर्शन : ‘साम टीव्ही’चे संपादक नीलेश खरे
अध्यक्ष : संजीव पिंपरकर, निवासी संपादक, दैनिक दिव्य मराठी, सोलापूर

दुसरे सत्र : प्रिंट मिडियाचे भवितव्य काय?
मार्गदर्शन : मुंबईचे माध्यमतज्ज्ञ युवराज मोहिते 
अध्यक्ष : अभय दिवाणजी, सहयोगी संपादक, दैनिक सकाळ, सोलापूर

तिसरे सत्र : पर्यायी माध्यमांचे प्रयोग
मार्गदर्शन : ‘मॅक्समहाराष्ट्र’चे संपादक रवींद्र आंबेकर
अध्यक्ष : सचिन जवळकोटे, संपादक, लोकमत, सोलापूर

चौथे सत्र : वंचित घटकांतील मुलांचे शिक्षण
अध्यक्ष : चिपळूणमधील ‘श्रमिक सहयोग’चे कार्यवाह राजन इंदुलकर 

नावनोंदणी :
ही कार्यशाळा नि:शुल्क असणार आहे; मात्र त्यासाठी नोंदणी आवश्यक असून, http://www.sveri.ac.in/ या वेबसाइटवर पत्रकारांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील (९५९५९ २११५४) व संतोष हलकुडे (९५४५५ ५३६२८)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Santosh Halkude About 291 Days ago
SVERI's nice work , Best News
1
0
Dawal Mahibub Inamdar About 295 Days ago
Nice &excellent activity of news reporter,future advanced knowledge journalism....I like & Best wishesh work to Media Team....
2
0
Prashant More About 295 Days ago
Nice work for reporter
2
0

Select Language
Share Link
 
Search