Next
महात्मा फुले जयंतीनिमित्त चंदनाच्या बियाण्याचे वाटप
BOI
Saturday, April 13, 2019 | 02:12 PM
15 0 0
Share this article:

पुणे : स्त्री शिक्षणाचे प्रणेते व थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त हरितमित्र परिवार संस्थेच्या वतीने १५१ विद्यार्थ्यांना चंदनाच्या बियाण्याचे  व औषधी वनस्पतींच्या रोपांचे वाटप करण्यात आले. 

नेहरू युवा केंद्राचे यशवंत माणखेडकर आणि सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक घोलप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बियाणे वाटण्यात आले. या वेळी हरितमित्र परिवार संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे, ज्येष्ठ कृषीतज्ञ पंडित गावडे , हर्षदा गावडे, इंदापूरचे शेतकरी सुरेश जगताप, समाज कल्याण खात्याच्या अधिकारी उषा कदम, समाजसेवक सुरेश परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते.    

‘पर्यावरण विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यास विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संवर्धन व लागवड या विषयी जनजागृती निर्माण होईल. संस्थेतर्फे एक वर्ष वृक्ष संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे,’ असे डॉ. घागरे यांनी नमूद केले.

स्वाती मुंदडा यांनी सूत्रसंचालन केले. इंदिरा अहिरे यांनी प्रास्ताविक केले, तर आनंद घरत आणि ललित राठी यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search