Next
‘इंडसइंड बँकेच्या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये वाढ
प्रेस रिलीज
Wednesday, October 17 | 03:33 PM
15 0 0
Share this story

मुंबई : इंडसइंड बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाने ३०  सप्टेंबर २०१८ पर्यंतच्या दुसऱ्या तिमाहीतील व पहिल्या अर्धवर्षातील अनऑडिटेड वित्तीय निकालांना मंजुरी दिली. ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये दुसऱ्या तिमाहीत २२ टक्के म्हणजे १ हजार ९९२ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

३० सप्टेंबरपर्यंतच्या तिमाहीतील कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये अशी : तिमाहीत नेट इंटरेस्ट इन्कममध्ये गतवर्षीच्या तुलनेत २१ टक्के इतकी वाढ झाली. तिमाहीत कोअर फी इन्कम एक हजार २१८ कोटी रुपये होते, तर २०१७-१८ या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत एक हजार १३ कोटी रुपये होते, त्यात २० टक्के वाढ झाली. तिमाहीत नॉन-इंटरेस्ट इन्कममध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात ११ टक्के वाढ झाली. दुसऱ्या तिमाहीत पाच टक्क्यांनी वाढ झाली. वन-ऑफ प्रुडेन्शिअल काँटिन्जेंट प्रोव्हिजन वगळता करोत्तर नफ्यात २५ टक्क्यांनी वाढ झाली.

चालू तिमाहीत क्रेडिट कॉस्टमध्ये १२ अॅडव्हान्सेसवरील बेसिस पॉइंट्सपर्यंत (बीपीएस) घट झाली. गतवर्षातील तिमाहीत हे प्रमाण १७ बीपीएस होते. विशिष्ट कॅश फ्लोवर व विशिष्ट मालमत्तांसंबंधी, पायाभूत सुविधा क्षेत्रातील समूहाच्या विविध कंपन्यांना देण्यात आलेल्या अॅडव्हान्सेसना, आजवरच्या अकाउंट्सनुसार, इन्कम रेकगनिशन, अॅसेट क्लासिफिकेशन अँड प्रोव्हिजनिंग (आयआरएसी नॉर्म्स) यासाठीच्या प्रुडेन्शिअल नॉर्मबाबतच्या आरबीआय मास्टर करिक्युलरनुसार ‘स्टँडर्ड’ असे म्हणण्यात आले. या समूहात प्रशासन व व्यवस्थापन या बाबतीत विशिष्ट बदल झाले आहेत आणि त्यासंदर्भात बदल करण्यासाठी रिझोल्युशन प्लानद्वारे उपाय केले जात आहेत. रिझोल्युशन प्लानच्या विकासावर व अंमलबजावणीवर बँकेच्या व्यवस्थापनाची नजर आहे. दरम्यान, योग्य उपाय म्हणून बँकेने या ‘स्टँडर्ड’ मालमत्तांसाठी २७५ कोटी रुपयांची काँटिंजंट प्रोव्हिजन केली आहे व त्याचा समावेश ३० सप्टेंबर २०१८ पर्यंतच्या तिमाहीत प्रोव्हिजन्स (करांव्यतिरिक्त) व काँटिंजन्सीज या अंतर्गत करण्यात आला.

या कामगिरीविषयी बोलताना इंडसइंड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोमेश सोबती म्हणाले, ‘मागील काही तिमाहींप्रमाणेच बँकेने या तिमाहीतही स्थिर कामगिरी कायम राखली. जोखीम हाताळणे व योग्य, न्याय्य बँकिंगचे कठोर पालन करणे, यामुळे बँकेच्या कामगिरीला चालना मिळाली. आणखी एक तिमाही सातत्यपूर्ण कामगिरी केल्याचे आम्हाला समाधान वाटते.’

‘नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या बाबतीत नावीन्य आणण्याच्या आमच्या वैशिष्ट्याला अनुसरून आम्ही या तिमाहीत आर्टिफिशिअल इंटलिजन्सवर (एआय) आधारित अलेक्सा स्किल-इंडस असिस्ट ही सुविधा दाखल केली. या सुविधेच्या मदतीने व्हॉइस या माध्यमाद्वारे वित्तीय व बिगर-वित्तीय बँकिंग व्यवहार करता येतील. दोन मॅग्नेटिक स्ट्रिप्स व दोन ईएमव्ही चिप्स असलेले इंडसइंड बँक ड्युओ कार्ड हे डेबिट व क्रेडिट अशा दोन्ही कार्डांची वैशिष्ट्ये समाविष्ट करेल. या दोन सेवांची घोषणा करून आम्ही ग्राहकांना आनंद व सोय देण्याची आमची बांधिलकी अधोरेखित केली आहे,’ असे सोबती यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link