Next
सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा वार्षिक कार्यक्रम
प्रेस रिलीज
Monday, March 26, 2018 | 03:28 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ने १४ मार्च २०१८रोजी आपला १०वा वार्षिक कार्यक्रम साजरा केला. ‘निपमण फाउंडेशन’चे सहसंस्थापक आणि सीईओ निपुण मल्होत्रा मुख्य अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.

‘लीडरशिप अँड सोशल चेंज’ ही या इव्हेंटसाठी थीम ठरविण्यात आली होती. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या निपुण मल्होत्रा यांनी विकलांग लोकांसमोरची वाढती आव्हाने, त्यांच्याप्रति वाढत असलेली सहिष्णुता आणि सामाजिक बदल या विषयावर प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. 

निपुण मल्होत्रा अपंग व्यक्तींसाठी आरोग्य आणि समर्थन क्षेत्रात कार्य करत आहेत. ‘पिनिदा फाउंडेशन’ या ‘वर्ल्ड अनेबल’
उपक्रमाचे ते व्हिजिटिंग फेलो आहेत. तसेच ते ‘सी.आय.आय नॅशनल कमिटी ऑन स्पेशल अॅबिलिटी’चे सदस्य आहेत. ही समिती कॉर्पोरेट क्षेत्रात अपंग व्यक्तींना समाविष्ट करण्यास प्रोत्साहित करते. व्हीलचेअर आणि विकलांगांच्या देणगीदारांमधील अंतर कमी करणे, हे त्यांचे आयुष्याचे ध्येय आहे. 
माननीय कुलपती, पद्मभूषण डॉ. एस. बी. मुजुमदार या वेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, ‘कोणत्याही देशाच्या विकासासाठी सतत नवनवीन उपक्रम राबविणे, ही प्रेरक शक्ती असते.’ 

प्रा. कुलपति सिम्बायोसिस, डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या, ‘शैक्षणिक विद्यापीठे युवकांचा बौद्धिक विकास आणि मूल्यांना जोपसण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.’ याप्रसंगी डॉ. विद्या यांनी निपमण फाउंडेशनला दहा व्हीलचेअर देण्याची घोषणा केली.

२०१०पासून ‘एस.एस.ई.’ या संस्थेची कार्ये सांभाळणाऱ्या संचालक, डॉ. ज्योति चांदीरामणी, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link