Next
‘देशाच्या प्रगतीमध्ये अभियंत्यांचा मोठा वाटा’
प्रेस रिलीज
Tuesday, September 18, 2018 | 05:12 PM
15 0 0
Share this article:

अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना  हेमंत निंबाळकर

पुणे : ‘माहिती तंत्रज्ञानापासून ते शेतीपर्यंत आणि मोटारीपासून ते निवाऱ्यापर्यंत प्रत्येक क्षेत्राच्या प्रगती अभियंत्यांवर अवलंबून असते. म्हणूनच देशाच्या प्रगतीमध्ये अभियंत्यांचा मोठा वाटा आहे,’ असे मत अमित गोयल यांनी मांडले.

अभियांत्रिकी क्षेत्राचे जनक भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अभियंता दिनानिमित्त गोयल गंगा डेव्हलपर्सच्या बावधनमधील गंगा लेजंड साइटवर अभियंत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी अमित गोयल बोलत होते. या वेळी जी. ए. भिलारे कन्सल्टंट प्रा.लि.चे संचालक जी. ए. भिलारे, हेमंत निंबाळकर उपस्थित होते.

अभियांत्रिकी क्षेत्राचे जनक भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना अभिवादन करताना निखिल अत्रे, कुमार बर्डे, जी. ए. भिलारे,  हेमंत निंबाळकर, उदय पाटील.

या वेळी गोयल म्हणाले, ‘अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. शेतकरी अन्न पिकवत असले, तरी शेतीच्या मशागतीसाठी लागणारी उपकरणे तयार करण्याचे काम अभियंता करतो; तसेच शेतीसाठी लागणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी अभियंता जलाशयावर धरण बांधण्याचे देखील काम करतो. घर बांधणीपासून पायाभूत सुविधा तयार करण्यापर्यंतची कामे अभियंता करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तू तयार करून आपले आयुष्य सुखकर करण्याचे काम ही अभियंता करत असतो.’

निंबाळकर यांनी उंच इमारतींच्या संकल्पना, साइटवर काम करताना अपघात कसे टाळता येतील, येथील सुरक्षिततेसंदर्भात सावधानता कशी बाळगावी, तसेच स्ट्रक्चरल डिझाइनची प्रक्रिया आणि डिझाइनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर्सविषयी चर्चा केली. त्यानंतर अभियंत्यांच्या शंकांचे निरसन करत त्यांना मार्गदर्शनही केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search