Next
‘एआयटी’मध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
संस्थेच्या रजत जयंतीनिमित्त अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, December 27, 2018 | 12:44 PM
15 0 0
Share this storyपुणे : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीने (एआयटी) आपल्या आजी-माजी विद्यार्थ्यांना एकत्र येऊन माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या हेतूने माजी विद्यार्थी मेळावा नुकताच साजरा केला. या मेळाव्याला संस्थेचे भारतातील आणि परदेशातील सुमारे २०० माजी विद्यार्थी उपस्थित होते.

संस्थेच्या दिघी कॅंपस येथे झालेल्या या मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना आपले संस्थेतील अनुभव सांगितले. कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे माजी विद्यार्थी हे तिचे ब्रँड अँबॅसेडर असतात. या नामवंत संस्थेचे माजी विद्यार्थी जगात सर्वत्र संस्थेचे प्रतिनिधित्व करत आहेत; पण दूर असूनही एकमेकांच्या संपर्कात राहून जुने संबंध दृढ करत संस्थेला सध्याच्या तंत्राधारित, स्पर्धात्मक जगाशी जोडण्याचे काम करत आहेत. माजी विद्यार्थी मेळावा भरविण्याची प्रथा २००० साली सुरू झाली.

या वर्षी विविध क्षेत्रात नाव कमावलेले संस्थेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात पुस्तक प्रकाशन, अनुभव कथन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘एआयटी’च्या ज्येष्ठ अध्यापक आणि व्यवस्थापकांनी उपस्थितांना संस्थेच्या आजपर्यंतच्या प्रगतीची, तसेच भविष्यातील योजनांची माहिती दिली.

ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यानी सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी ओपन हाउस पद्धतीने खुली चर्चा केली आणि  आणि समाजाभिमुख उद्योजकता, चौथी औद्योगिक क्रांती अशा विविध विषयांवर विचार मांडले. एसएपी लॅबचे माजी चीफ आर्किटेक्ट विमल राठोड आणि मोबिलियाचे (क्वेस्ट ग्लोबल समूहातील कंपनी) संस्थापक अंकुश तिवारी हे संस्थेचे माजी विद्यार्थी मुख्य वक्ते होते. मुख्य सत्रात रवीन जानू यांचे संयुक्त राष्ट्रसंघात उपलब्ध असलेल्या कामाच्या विविध संधींची माहिती देणारे व्याख्यान झाले. ते संयुक्त राष्ट्रसंघात सुरक्षा विभागात काम करतात. अकसेंचर या बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक असलेल्या मुकेश शुक्ला यांनी ‘वेअर हाउस मॅनेजमेंट’ विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन या प्रसंगी झाले. महिंद्रा उद्योगसमूहात  वरिष्ठ व्यवस्थापक असलेल्या पवन यादव यांनी त्यांच्या व्यापारउद्योग क्षेत्रावर लिहिलेल्या पुस्तकांचा परिचय करून दिला.

‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडिअर अभय भट यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. माजी विद्यार्थी संघाचे कार्यकारी सचिव प्रा. मनोज खळदकर माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्याबद्दल माहिती दिली. संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना एकत्र जोडणारे इंटरनेट रेडिओ क्लब हे नेटवर्क यानिमित्ताने कार्यान्वित करण्यात आले. समारोपप्रसंगी २००३च्या तुकडीचे विद्यार्थी, ‘ऍकॉप्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ‘एआयटी’च्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विजेंदर यादव यांनी सर्वांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link