Next
रत्नागिरीत गुरुवारी दिवाळी पहाट मैफल
BOI
Wednesday, October 18, 2017 | 04:55 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : शहरवासियांना खमंग, खुसखुशीत गाण्यांच्या श्रवणीय फराळाची मेजवानी लक्ष्मीपूजनाला पहाटे मिळणार आहे. निमित्त आहे जयेश मंगल पार्क आणि स्वराभिषेक, रत्नागिरी प्रस्तुत दिवाळी पहाट शास्त्रीय-सुगम मैफलीचे.

मनोज पाटणकर आणि जयेश मंगल पार्कचे प्रा. राजशेखर मलुष्टे यांची ही संकल्पना असून त्याला मूर्त स्वरूप दिले आहे विनया परब आणि ‘स्वराभिषेक’च्या कलाकारांनी. मैफलीत शास्त्रीय संगीताबरोबरच दिवाळीच्या खास गीतांची मेजवानी मिळणार आहे. या मैफलीचे हे दुसरे वर्ष आहे.

स्वराभिषेक संगीत वर्गाचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार असून प्रा. मलुष्टे, समर्थ कॅटरर्सचे ओंकार रहाटे आणि मनोज पाटणकर यांचे सहकार्य लाभले आहे. या मैफलीसाथी महेश दामले (संवादिनी), मंगेश मोरे (सिंथेसायझर), केदार लिंगायत (तबला), मंगेश चव्हाण (ढोलक-पखवाज) आणि प्रवीण पवार (ऑक्टोपॅड) संगीतसाथ करणार आहेत.

या श्रवणीय फराळाचा रसिकांनी मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मैफलीविषयी :

दिवस : गुरुवार, १९ ऑक्टोबर २०१७
वेळ : पहाटे ५.३० वाजता
स्थळ : जयेश मंगल पार्क, थिबा पॉईंट रस्ता, माळनाका, रत्नागिरी
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search