Next
‘एअर एशिया’चा बिग सेल धमाका
प्रेस रिलीज
Tuesday, September 04, 2018 | 02:48 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : एअर एशिया पुन्हा एकदा त्यांचा बहुप्रतिक्षित बिग सेल प्रमोशन घेऊन येत आहे. यात आशिया, ऑस्ट्रेलिया व इतर १२० हून अधिक मुक्कामांशी प्रवाशी जोडले जातील. बिग मेंबर्स १९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान प्रवास करण्यासाठी दोन ते नऊ सप्टेंबरपर्यंत बुकिंग करू शकतात; तसेच याचे वन-वे फेअर्स डॉमेस्टिक प्रवासासाठी ९९९ रुपयांपासून आणि इंटरनॅशनल प्रवासासाठी एक हजार ३९९ रुपयांपासून सुरू होत आहेत.

ही ऑफर एअर एशिया ग्रुप नेटवर्कद्वारे चालवण्यात येणाऱ्या सर्व फ्लाइट्सवर उपलब्ध आहे. एअर एशिया इंडिया (फ्लाइट कोड i5), एअर एशिया बर्हाद (फ्लाइट कोड AK), थाइ एअर एशिया (फ्लाइट कोड FD) आणि एअर एशिया (फ्लाइट कोड D7); तसेच airasia.com द्वारे आणि एअर एशिया मोबाईल अॅपवर करण्यात येणाऱ्या सर्व बुकिंग्जवर सवलत मिळणार आहे.

ऑल-इन वन-वे फेअर ९९९ रुपयांपासून इतक्या कमी दरांत उपलब्ध आहे. प्रवासी एअर एशिया सध्या उड्डाण घेत असलेल्या बेंगळुरु, नवी दिल्ली, कोलकाता, कोची, गोवा, जयपूर, चंदिगड, पुणे, गुवाहाटी, इंफाळ, विशाखापट्टणम, हैद्राबाद, श्रीनगर, बागडोग्रा, रांची, भुवनेश्वर, नागपूर, इंदोर, सुरत, अमृतसर व चेन्नई अशा २१ डॉमेस्टिक मुक्कामांमधून निवड करू शकतात.

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रवासी क्वालालम्पूर, बँकॉक, क्राबी, सिडनी, ऑकलंड, मेलबर्न, सिंगापूर, बाली व इतर अनेक मुक्कामांमधील आपल्या आवडत्या मुक्कामांची निवड करू शकतात. या प्रवासाचे ऑल-इन वन-वे फेअर एक हजार ३९९ रुपयांपासून इतक्या कमी दरांत उपलब्ध आहे एअर एशिया बिग मेंबर्स त्यांच्या एअर एशिया बिग पॉइंट्सचा वापर करून फ्लाइट्स रीडीम करत सवलतीचा देखील लाभ घेऊ शकतात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search