Next
बीबीसीने ध्वनीमुद्रित केलेल्या अरुण दातेंच्या गीतांना उजाळा
‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रम गुरुवारी पुणेकर रसिकांच्या भेटीला
BOI
Thursday, July 25, 2019 | 04:50 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘भेट तुझी माझी स्मरते...’, ‘सखी शेजारिणी, तू हसत रहा ...’, ‘डोळ्यांत सांजवेळी...’ या व अरुण दातेंनी गायलेल्या इतर अनेक गाण्यांनी रसिक मनांवर अधिराज्य गाजविले;परंतु दाते यांनी गायलेल्या ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी...’ व ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या गाण्यांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील घेतली गेली. आजपासून सुमारे चाळीस वर्षांपूर्वी २९ जुलै, १९७९ साली बीबीसी अर्थात ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने ही गाणी ध्वनीमुद्रित केली. विशेष म्हणजे ही दोन्ही गाणी बीबीसीने ध्वनीमुद्रित केलेली आजपर्यंतची पहिली आणि शेवटची मराठी गाणी ठरली.

या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधत उद्योजक गौरव कुलकर्णी यांच्या पुढाकाराने येत्या गुरुवारी, एक ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे अरुण दातेंच्या गाण्यांच्या अत्यंत गाजलेल्या अशा ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर तो दिला जाईल. 

कार्यक्रमात प्रसिद्ध गायक व संगीतकार मंदार आपटे, गायक श्रीरंग भावे, गायिका श्रुती जोशी यांचा सहभाग असून, अभिनेत्री अनुश्री फडणीस या निवेदन करणार आहेत. याबरोबरच अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते स्वत: आपल्या वडिलांच्या कारकीर्दीतील रसिकांनी सहसा न ऐकलेल्या आठवणींचा खजिना उपस्थितांसमोर उलगडून दाखवतील. दृकश्राव्य माध्यमातून (ऑडिओ-व्हिज्युअल) अरुण दाते यांचा असणारा सहभाग हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या कलाकारांपैकी मंदार आपटे हे ‘राधा ही बावरी’ या मालिकेबरोबरच ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाचे संगीतकार आणि गायक आहेत, तर श्रीरंग भावे हे ‘बालगंधर्व’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांचे गायक आहेत. श्रुती जोशी या अनुराधा कुबेर यांच्या शिष्या असून, ‘व्हॉट्स अप लग्न’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. याबरोबरच कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या अनुश्री फडणीस या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘दशक्रिया’ चित्रपटातील अभिनेत्री आहेत. विशेष म्हणजे अरुण दाते यांनी जेव्हा वयोमानापरत्वे ‘शुक्रतारा’ कार्यक्रम करणे थांबवले, तेव्हा त्यांनी त्यांचे सुपुत्र अतुल दाते मंदार आपटे आणि श्रीरंग भावे यांना ‘नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम करण्याची खास परवानगी दिली होती.

कार्यक्रमाविषयी :
 
नवा शुक्रतारा 
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, 
दिवस व वेळ : गुरुवार, एक ऑगस्ट, संध्याकाळी ५.३० वाजता
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search