Next
निखळ हसू फुलवणाऱ्या ‘बोलक्या रेषा’
BOI
Saturday, May 05 | 03:51 PM
15 0 0
Share this story

पुणे : रोजच्या आयुष्यातील प्रसंगावर मार्मिक भाष्य करणारी हास्यचित्रे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात. अशा चित्रांद्वारे होणारी टीकादेखील अगदी निखळ आनंद देणारी ठरते. अशीच उत्तम हास्यचित्रे पाहण्याची संधी नुकतीच पुणेकरांना मिळाली. अनेक रसिकांनी ही चित्रे पाहून निखळ हास्याचा आनंद घेतला. चित्रकार घन:श्याम देशमुख यांनी वेगवेगळ्या विषयांवर चितारलेल्या ‘बोलक्या रेषा’ या हास्यचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात करण्यात आले होते. 

दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या घटना, त्यातील विरोधाभास, मानवी स्वभावाचे विलक्षण कंगोरे त्यांनी अगदी उत्तम प्रकारे या चित्रांतून साकारले आहेत. बोलीभाषेतील ठसक्याने तर या चित्रांची मार्मिकता अधिकच वाढवली.    घनःश्याम देशमुख हे गेल्या वीस वर्षांपासून चित्रकला क्षेत्रात काम करत असून, आतापर्यंत त्यांनी हजारो हास्यचित्रे रेखाटली आहेत. कमीत कमी रेषा, रंगसंगतीची विविधता यातून व्यक्त होणारा भरपूर आशय  ही त्यांच्या  चित्रांची खास वैशिष्ट्ये आहेत.

(चित्रकार घनःश्याम देशमुख यांचा प्रवास व ‘बोलक्या रेषा’या प्रदर्शनाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.. )

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link