Next
पुण्यात रंगला चिमुरड्यांचा ‘फॅशन शो’
प्रेस रिलीज
Tuesday, May 22, 2018 | 02:57 PM
15 0 0
Share this article:


पुणे :  ब्रँडेड स्टायलीश कपडे, आकर्षक मेकअप करून पाश्चात्त्य संगीताच्या तालावर रॅम्पवर चालणारी छोटी मुले आणि मुली बघून, टाळ्यांचा कडकडाट आणि चिअर अपच्या घोषणा यामुळे सभागृह दणाणून जात होते. निमित्त होते ‘ज्युनिअर्स  फॅशन वीक’चे. 

रविवारी येथील जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमध्ये हा ‘ज्युनिअर्स  फॅशन शो’ रंगला होता. ‘ज्युनिअर्स  फॅशन वीक’च्या वतीने आयोजित या फॅशन शो मध्ये चार ते चौदा वर्ष वयोगटातील या छोट्या मॉडेल्सनी भाग घेतला होता. शंभरपेक्षा अधिक मुली, मुले यामध्ये सहभागी झाली होती.

 ‘यु एस पोलो असोसिएशन किड्स’, फ्लायिंग मशीन बॉईज, मार्क्स अँड स्पेंसर, चिल्ड्रेन प्लेस सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडसच्या ‘स्प्रिंग समर कलेक्शन’ चे सादरीकरण या वेळी करण्यात आले. प्रथमच फॅशन शो मध्ये सहभागी झालेल्या या मुलांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता.  ‘जेएफडब्लू रनअवे’मध्ये पालक, खरेदीदार यांसोबतच अनेक आघाडीच्या फॅशन हाऊसेसचे प्रतिनिधी आणि फॅशन क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. 

यंदाचा हा सोळावा ज्युनिअर्स  फॅशन वीक होता. मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैद्राबाद अशा मोठ्या शहरांसह पुण्यातही यंदा या शोचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 


(ज्युनिअर मॉडेल्सचा फॅशन शो पाहा सोबतच्या व्हिडिओत)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search