Next
पीएनजी ज्वेलर्सचे पिंपळे सौदागरमध्ये दुसरे फ्रँचायझी स्टोअर
करिष्मा कपूरच्या हस्ते उद्घाटन
BOI
Wednesday, October 31, 2018 | 05:40 PM
15 0 0
Share this article:

‘पीएनजी ज्वेलर्स’च्या पिंपळे सौदागर येथील दुसऱ्या फ्रँचायझी स्टोअरचे उद्घाटन अभिनेत्री करिष्मा कपूरच्या हस्ते झाले.

पुणे : औंधमधील पहिल्या फ्रँचायजी स्टोअरच्या यशानंतर अवघ्या १५ दिवसातच ‘पीएनजी ज्वेलर्स’ने पिंपळे सौदागर येथे दुसरे फ्रँचायझी स्टोअर सुरू केले आहे. या स्टोअरचे उद्घाटन अभिनेत्री करिष्मा कपूर ह्यांच्या हस्ते झाले. या फ्रँचायझी स्टोअरमध्ये आजच्या काळातील महिलांसाठी क्लासिक, तसेच समकालीन डिझाईनचे दागिने उपलब्ध आहेत. हे स्टोअर पिंपळे सौदागर येथील शिवार चौक या मध्यवर्ती ठिकाणी आहे. 

या स्टोअरचे स्वरूप पीएनजी ज्वेलर्सच्या इतर स्टोअर्सप्रमाणेच असून, ब्रँडचा उच्च गुणवत्ता व मानकांचा वारसा पुढे नेईल. प्रत्येक फ्रँचायझी स्टोअरमध्ये पीएनजी ज्वेलर्सतर्फे एक व्यवस्थापक उपलब्ध असणार आहे. 


या वेळी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘आमच्या औंध येथील पहिल्या फ्रँचायझी स्टोअरच्या यशाने आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. ग्राहकांना खरेदीचा सर्वोत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न पीएनजी नेहमीच करत आले आहे. आम्हाला केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनदेखील फ्रँचायझी स्टोअरसाठी मागणी येत आहे. याच प्रकारे प्रतिसाद मिळत राहिला, तर पुढील दोन वर्षात २० स्टोअर्स सुरू करण्याचे आमचे लक्ष्य आम्ही सहजरित्या पार करू शकू. पुण्यातील दुसरे फ्रँचायझी स्टोअर हे आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असून, ते  पीएनजी ज्वेलर्ससाठी या शहराचे महत्व अधोरेखित करते.’

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search