Next
सोशल मीडियाद्वारे पैसे पाठवण्याची आयसीआयसीआय बँकेद्वारे सुविधा
प्रेस रिलीज
Thursday, April 05 | 05:21 PM
15 0 0
Share this story

मुंबई : एकत्रित मालमत्तेच्या बाबतीत देशातील सर्वांत मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने अनिवासी भारतीयांसाठी (एनआरआय) व्हॉट्सअॅप व ईमेल अशा सोशल मीडियाचा वापर करून भारतातील लाभार्थींना पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ‘सोशल पे’ असे नाव असलेली व कोणत्याही भारतीय बँकेने दिलेली ही पहिलीवहिली सेवा बँकेच्या मनी2इंडिया (एम2आय) या अॅपवर आहे. या नव्या सेवेमुळे ‘एनआरआय’ना त्यांच्या मित्रांना व कुटुंबांना सण व वाढदिवस अशा विशेष कारणांनिमित्त पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

पैसे पाठवण्यासाठी एम2आय अॅपवरून सुरक्षित लिंक निर्माण करावी व त्यांच्या बँकेचा तपशील देण्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर किंवा ई-मेलवर शेअर करावी. २४ तासांसाठी वैध असलेल्या या लिंकला पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीकडून चार आकडी कोडचे संरक्षण दिले जाते व हा कोड ती व्यक्ती पैसे स्वीकारणाऱ्या लाभार्थीला पाठवते. त्यानंतर लाभार्थी बँकेचा तपशील देण्यापूर्वी पासकोडची खातरजमा करतो. त्यानंतर एम2आय युजर पुन्हा खात्री करतो व संबंधित व्यवहार सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी अॅपवरील पेमेंट तपशील कन्फर्म करतो. सोशल मीडियाद्वारे परदेशात रेमिटन्स करण्याची सुविधा देणाऱ्या जगभरातील मोजक्या बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक लिमिटेड समाविष्ट आहे व भारतातील अशी पहिलीच बँक आहे.

या सुविधेविषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक विजय चंडोक म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँक ही भारतातील रेमिटन्स क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी आहे. जगभर अधिकाधिक लोक सोशल मीडियाशी जोडले जात असल्याने, ‘सोशल पे’ या माध्यमाद्वारे निधी हस्तांतराची प्रक्रिया सुलभ होणार आहे व ग्राहकांनाही ते सोयीचे ठरणार आहे. आमच्या मनी2इंडिया रेमिटन्स अॅपच्या युजरना ते नियमित वापरत असलेल्या सोशल मीडियाच्या साह्याने वाढदिवस व सण अशा खास निमित्ताने त्यांच्या मित्रांना व कुटुंबीयांना पैसे पाठवणे शक्य होईल. या सुविधेमुळे, आयसीआयसीआय बँक परदेशातील सेग्मेंट/बिझनेस व ऑनलाइन निधी हस्तांतर या क्षेत्रातील आपले कौशल्य उपलब्ध करून देणार आहे.’
माहितीची सुरक्षितता व गोपनीयता यांची खबरदारी घेण्यासाठी बँकेच्या सुरक्षित चॅनेलचा वापर करून मनी2इंडिया अॅप आणि सोशल मीडिया यांच्यातील संवाद साधला जातो. या सुविधेमार्फत केल्या जाणाऱ्या कोणत्याही व्यवहारासाठी बँक व एम2आय युजर यांच्यामध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन केले जाते व यामुळे निधी हस्तांतर सुरक्षितपणे केले जाईल, याची दक्षता घेतली जाते.

मनी2इंडिया अॅपवरून ‘सोशल पे’ वापरण्याचे सोपे टप्पे :

पैसे पाठवणाऱ्याने व्यवहार सुरू करावा. एम2आय अॅपला लॉगिन करावे > रक्कम टाकावी > ‘सोशल पे’ सिलेक्ट करावे > चार आकडी पासकोड द्यावा > बँक खाते निवडावे, रेमिटन्सचे उद्दिष्ट निवडावे. लिंक निर्माण केली जाईल व ती इच्छित सोशल चॅनलद्वारे शेअर करता येईल. पैसे पाठवणाऱ्याने लाभार्थीला स्वतंत्रपणे पासकोड देणे गरजेचे आहे.

लाभार्थीने पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लिंक वापरावी. एम2आय युजरने तयार केलेल्या सुरक्षित लिंकद्वारे लाभार्थीने आपला बँक खात्याचा तपशील द्यावा. त्याने ट्रॅन्झॅक्शन लिंकवर क्लिक करावे व पैसे पाठवणाऱ्याने दिलेला चार आकडी पासकोड द्यावा. बँक खात्याचा तपशील द्यावा.

पैसे पाठवणाऱ्याने व्यवहार कन्फर्म करावा. लाभार्थीने आपला बँकेचा तपशील दिला की त्याची सूचना पैसे पाठवणाऱ्याला अॅपवर मिळते. त्यानंतर तो पैसे स्वीकारणाऱ्याच्या बँक खात्याच्या तपशिलाची अॅपवर खातरजमा करून व्हॅलिडेट करतो आणि कन्फर्मही करतो.  

मनी2इंडिया रेमिटन्स सुविधेसाठी तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवा सुरू केल्या जात असताना ही नवी सुविधा दाखल करण्यात आली आहे. बँकेने अलीकडेच विविध वैशिष्ट्ये असलेली नवी एम2आय वेबसाइट व मोबाइल अॅप दाखल केले. त्यातील व्हॉइस-बेस्ड इंटरनॅशनल रेमिटन्स सेवा यासह अनेक सुविधा या क्षेत्रातील पहिल्यावहिल्या आहेत.

भारतातील रेमिटन्स क्षेत्रात आयसीआयसीआय बँक आघाडीची बँक आहे. मनी2इंडिया गेली १५ वर्षे देशात रेमिटन्स सेवा देत आहे आणि जगभरातील लक्षावधी ‘एनआरआय’ना पैसे पाठवण्याची सुविधा देत आहे. बँकेने झटपट व सुलभ ट्रान्स-बॉर्डर निधी हस्तांतर सेवा देण्यासाठी जगभरातील विविध बँकांशी जोडून घेतले आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link