Next
वेटलिफ्टिंगमध्ये जेरेमी लालरिन्हुंगाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
महाराष्ट्राच्या आशा अभिषेक निपाणे आणि खुशाली गांगुर्डेवर
BOI
Thursday, January 10, 2019 | 05:43 PM
15 0 0
Share this article:

जेरेमी लालरिन्हुंगा

पुणे : गेल्या वर्षी युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत, भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा जेरेमी लालरिन्हुंगा हा खेलो इंडिया युथ गेम्सच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहे. 

सोळा वर्षीय जेरेमीने पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युटमध्ये प्रशिक्षण घेतले असून, खेलो इंडिया गेम्सच्या पहिल्या स्पर्धेत तो सहभागी झाला होता. त्या वेळी त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ६२ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले होते. यंदा तो स्वत:च्या राज्याचे अर्थात मिझोरामचे प्रतिनिधित्व करणार आहे. या वेळी तो ६७ किलो गटात नशीब आजमावणार आहे. उझबेकिस्तान येथे गतवर्षी झालेल्या आशियाई युवा व कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जेरेमीचा समावेश होता. 

त्याचा सहकारी जेकब वॅनलालटुंगा याने या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. त्यानेही गतवेळी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. यंदा तोदेखील मिझोरामकडून सहभागी होत आहे. जेरेमीप्रमाणेच त्यानेही आर्मी स्पोर्टस   इन्स्टिट्युटमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.


महाराष्ट्राच्या आशा मुलांच्या गटात अभिषेक निपाणे (२१ वर्षांखालील -६७ किलो) आणि मुलींच्या विभागात खुशाली गांगुर्डे (२१ वर्षांखालील -४५ किलो) यांच्यावर केंद्रीत झाल्या आहेत. अभिषेक मनमाडचा विद्यार्थी असून, त्याने गतवेळी खेलो इंडियामध्ये रौप्यपदक पटकाविले होते; तसेच त्याने गतवर्षी युवा व कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील ४४ किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.

‘महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि हरियाणाचे वेटलिफ्टर चांगली कामगिरी करीत असून, अरुणाचल प्रदेशातील मुलांचीही राष्ट्रीय पातळीवरील कामगिरी उंचावली आहे. मुलींमध्ये मणिपूर वर्चस्व गाजवत आहे. मागील वर्षी त्यांनी खेलो इंडियामध्ये चार सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकले होते. इतर राज्यांमध्ये पंजाब व उत्तराखंडमधील वेटलिफ्टर्स प्रभावी कामगिरी करतील’, असे माजी राष्ट्रीय प्रशिक्षक पाल सिंग संधू यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search