Next
जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुका २३ जूनला
BOI
Saturday, May 25, 2019 | 05:48 PM
15 0 0
Share this article:

राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारियामुंबई : ‘रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमधील नऊ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध १६ पंचायत समित्यांमधील १६ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता २३ जून रोजी मतदान होणार असून, २४ जून रोजी मतमोजणी होईल,’ अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी नुकतीच मुंबई येथे दिली.

‘या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे तीन ते आठ जून या कालावधीत स्वीकारली जातील. पाच जून रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी १० जून रोजी होईल. अपील नसल्यास १५ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील, तर अपील असल्यास १९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान २३ जून रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल,’ असेही सहारिया यांनी सांगितले. 

पोटनिवडणूक होणारे जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग याप्रमाणे आहेत : रायगड- कळंब (ता. कर्जत), पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर), अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी), हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी), वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).

पोटनिवडणूक होणारे पंचायत समितीनिहाय गण या प्रमाणे : पेण (जि. रायगड)- वडखळ, पालघर (पालघर)- खैरापाडा, हवेली (पुणे)- वाडेबोल्लाई, कागल (कोल्हापूर)- माद्याळ, देवळा (नाशिक)- महालपाटणे, चाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारे, नेवासा (अहमदनगर)- सोनई, कर्जत (अहमदनगर)- कोरेगाव, केज (बीड)- आडस, बिलोली (नांदेड)- अटकळी, माहूर (नांदेड)- वाई बा, मुखेड (नांदेड)- जांब बु., औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाख, गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search