Next
रत्नागिरीचा एसटी विभाग राज्यात अव्वल
रस्त्यावर गाड्या बंद पडण्याचे प्रमाण ‘वर्कशॉप’मधील दर्जेदार कामामुळे कमी
BOI
Monday, November 05, 2018 | 02:41 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : एसटी महामंडळाचा रत्नागिरी विभाग राज्यात अव्वल आहे. कारण रस्त्यावर एसटी बस बंद पडण्याचे राज्यातील सर्वांत कमी प्रमाण रत्नागिरी विभागात आहे. येथील विभागीय कार्यशाळेत (टीआरपी) पूर्ण क्षमतेने व दर्जेदार काम होत असल्याने हे यश साध्य झाले आहे, अशी माहिती प्रभारी विभाग नियंत्रक तथा यंत्र अभियंता (चालन) विजयकुमार दिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील सर्वच्या सर्व म्हणजे ८०२ गाड्या रविवारी (चार नोव्हेंबर २०१८) रस्त्यावर होत्या. चार तारखेपासून दिवाळी सुरू झाल्याने प्रवाशांची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. या कालावधीत प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी प्रशासन प्रयत्नशील आहे. म्हणूनच कार्यशाळेत देखभाल-दुरुस्तीसाठी दाखल झालेल्या शेवटच्या १२ गाड्यांचे काम शनिवारी पूर्ण करण्यात आले. विभागीय कार्यशाळेत रविवारी ‘नो व्हेइकल डे’ साजरा करण्यात आला. रत्नागिरी विभागात रस्त्यावर एसटी बंद पडण्याचे प्रमाण प्रतिलाख किलोमीटर फेऱ्यांमागे ०.१४ एवढे कमी आहे. कार्यशाळेत पूर्ण क्षमतेने आणि दर्जेदार काम होत असल्यामुळेच हा टप्पा गाठणे शक्य झाल्याचे दिवटे यांनी सांगितले.

एसटीची विभागीय कार्यशाळा पूर्वी माळ नाक्यात होती. त्यानंतर तिचे स्थलांतर टीआरपी परिसरात झाले. तेथे सध्या १७ महिलांसह २१५ कारागीर, कर्मचारी कार्यरत आहेत. अॅप्रेंटिशिप करणारे १०२ उमेदवारही तेथे आहेत. विभागीय कार्यशाळेला भेट दिली असता सहायक यंत्र अभियंता आर. एम. शिंदे, भांडार अधिकारी भक्ती वेल्हाळ व पर्यवेक्षकांनी सर्व कामकाजाची माहिती दिली.

सुरक्षित सेवा, स्वच्छतेतून समृद्धीकडे, सुरक्षितता, काटकसर व खर्चात बचत, गुणवत्ता व सौजन्यशील वागणूक अशा उद्दिष्टांच्या प्रतिकृती प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळते, असे दिवटे यांनी सांगितले.

येथील भांडारामध्ये जिल्ह्यातील सर्व आगारांना लागणारे सुटे भाग उपलब्ध असतात. एका एसटी बसला सुमारे दोन हजार सुटे भाग जोडावे लागतात. कोणत्याही भागांची कमतरता येथे नाही. भांडार विभागात सर्वच्या सर्व २५ महिला कर्मचारी कार्यरत आहेत. दररोज सुमारे तीन याप्रमाणे महिन्याला ८० गाड्या दुरुस्त होतात. रस्त्यावर प्रवाशांना चालक, वाहक किंवा अधिकारी दिसत असतात. परंतु कारागीर हे पडद्यामागचे कलाकार आहेत. 

एसटी गाडी आरटीओ पासिंगसाठी वर्षातून एकदा नेली जाते. या गाड्यांची सर्व दुरुस्ती, रंगकाम, तसेच इलेक्ट्रिक, ब्रेक, बॉडी, सीट्स, मेकॅनिकल, रिकंडिशनिंग अशी कामे वर्कशॉपमधील १५ विभागांतून केली जातात. 

(विभागीय कार्यशाळेतील कामाची झलक)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link