Next
‘कलम ३७० रद्द केल्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जींचे बलिदान सार्थ’
भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
BOI
Monday, August 05, 2019 | 06:20 PM
15 0 0
Share this article:मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल सोमवारी (पाच ऑगस्ट) मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील या वेळी उपस्थित होते. ‘जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वह कश्मीर हमारा है’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.या वेळी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, आमदार राज पुरोहित, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आणि प्रवक्ते अतुल शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. ते म्हणाले, ‘जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देऊन देशाच्या अखंडतेला धोका निर्माण करणारे घटनेचे ३७०वे कलम रद्द करावे या मागणीसाठी जनसंघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पिढ्यान् पिढ्या काम केले. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, या मुद्द्यासाठी जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बलिदान दिले. आज भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत समाधानाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपटे राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांचे मी अभिनंदन करतो.’

मुखर्जींचे बलिदान सार्थ : राम नाईक
दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनीही या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन केले. ‘कलम ३७० काढून टाकण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे अभिनंदन! श्यामाप्रसाद मुखर्जींचे बलिदान तब्बल ६६ वर्षांनी सार्थ ठरले,’ असे उद्गार नाईक यांनी काढले.
 
‘काश्मीरला संपूर्ण भारतापासून तोडणारे आणि दहशतवादाला चालना देणारे कलम ३७० रद्द करण्यात यावे यासाठी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी थेट काश्मीरला जाऊन आंदोलन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आज तोच वैचारिक वारसा घेऊन चालणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कलम ३७० काढून टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय संसदेत घेतला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्याप्रमाणे कठोर, पण आवश्यक निर्णय घेऊन राबविले, तोच कणखरपणा आज संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दाखविला आहे. आज खऱ्या अर्थाने काश्मीर स्वतंत्र झाले आहे,’ अशी प्रतिक्रिया नाईक यांनी व्यक्त केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search