Next
‘चित्रपट माध्यम समाजात सकारात्मक बदल घडवू शकते’
‘सन राइज’ चित्रपटाच्या निमित्ताने निर्मात्या विभा बक्षी यांनी मांडले मत
BOI
Monday, February 25, 2019 | 03:09 PM
15 0 0
Share this story

विभा बक्षीमुंबई : ‘स्त्री-पुरुष समानता हा विषय कितीही चर्चिला, तरी आजही आपण तिथेच आहोत, जिथे काही दशकांपूर्वी होतो. लिंग समानता आणि त्यासंबंधीच्या गोष्टी याबाबत पुढच्या पिढीशी सुरुवातीपासूनच संवाद साधला पाहिजे, त्यांना आधीपासूनच या गोष्टी समजल्या पाहिजेत आणि चित्रपट हे यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते’, असे मत चित्रपट निर्मात्या विभा बक्षी यांनी व्यक्त केले आहे. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या निर्मात्या विभा बक्षी या ‘युनायटेड नेशन्स वूमन’ यांच्या सहयोगाने लैंगिक समानता या विषयावर आधारित असलेला आगामी ‘सन राइज’ (Son Rise) हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी लैंगिक समानता या विषयावर आपले मत व्यक्त केले. 

‘सन राइज’ ही हरियाणामधील एक कथा आहे. हरियाणा हे भारतातील असे एक राज्य आहे, जिथे सर्वांत जास्त लैंगिग गुन्हे घडतात. जिथे खाप पंचायतीला आधार दिला जातो. अशा ठिकाणी घडणाऱ्या घटना, त्यांचा स्त्रीयांच्या आयुष्यावर होणारा परिणाम आणि येणाऱ्या पिढीवर पडणारा त्याचा प्रभाव या सगळ्या गोष्टी या चित्रपटातून दर्शवण्यात आल्या आहेत. महिला सुरक्षा यासारखा ज्वलंत विषय घेऊन हा चित्रपट येत आहे.

दरम्यान विभा यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘डॉटर्स ऑफ मदर इंडिया’ हादेखील देशातील बलात्काराची स्थिती आणि तत्सम विषयावर आधारित होता. या चित्रपटाच्या यशानंतर उत्साहित झालेल्या विभा यांनी ‘सन राइज’ या चित्रपटावर आता लक्ष केंद्रित केले असून, हा चित्रपटदेखील समाजमनाला भिडणारा असेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link