Next
पाटील विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
BOI
Tuesday, March 05, 2019 | 12:25 PM
15 0 0
Share this article:

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेली मुले.सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक एस. एम. बागल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पर्यवेक्षक डी. एम. गणपाटील उपस्थित होते. विद्यार्थांच्या संशोधनवृत्तीस चालना मिळण्यासाठी विभागप्रमुख चंद्रकांत मपले यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्याला मुख्याध्यापकांसह सर्वांचे सहकार्य लाभले.

इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला. साधारण ३० विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले. लहान गट व मोठा गट अशी विभागणी करून शाळेच्या दोन वर्ग खोल्यांमध्ये विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये लहान गटात सातवीतील साहिल मोहन काळे या विद्यार्थ्याने सादर केलेल्या लायफाय डाटा स्ट्रान्सफर या प्रयोगाला प्रथम क्रमांक मिळाला. सहावीतील श्रीराज सुरेश निंबाळकर याच्या वाटर अलार्मच्या प्रयोगाला द्वितीय, तर यश सदाशिव खरे याने सोलारवर चालणाऱ्या कुलर व फॅनच्या प्रयोगाला तृतीय क्रमांक मिळाला. हनुमंत नागनाथ वट्टमवार याचा अती ज्वलनशील पदार्थांची माहिती देण्यासाठी पाण्यावर जाळ लावण्याचा केलेला प्रयोग उत्तेजनार्थ ठरला.

मोठ्या गटात नववीतील अविराज ज्योतीराम साळुंखे याच्या रोबोट कारच्या प्रयोगाला प्रथम क्रमांक मिळाला. आठवीतील शुभम दत्तात्रय रोकडे याच्या स्विपिंग मशीनच्या प्रयोगासाठी द्वितीय, तर नववीतील करण सुधाकर रोकडे याच्या रोबोट क्लिनरच्या प्रयोगाला तृतीय क्रमांक मिळाला. आठवीतील प्रथमेश संजय कांबळे याने बनविलेल्या खत विस्कटण्याच्या मशीनचा प्रयोग उत्तेजनार्थ ठरला. यासाठी परीक्षक म्हणून सोमनाथ जगताप व धनाजी कोळी यांनी काम पाहिले.  

या वेळी बोलताना मुख्याध्यापक बागल यांनी या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन आल्याचे सांगितले.

‘विद्यार्थांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टीकोन कायम राहण्यासाठी आम्ही शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. खूप छान व लोकोपयोगी प्रयोगाची मांडणी विद्यार्थांनी या प्रदर्शनात केली. त्यामुळे हे प्रदर्शन विद्यार्थांच्या संशोधनवृत्तीस नक्कीच चालना देणारे ठरेल,’ असा विश्वास उपक्रमशील शिक्षक चंद्रकांत मलपे यांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
MALAPE CHANDRAKANT SITARAM About 157 Days ago
A active school work. Very nice.
0
0

Select Language
Share Link
 
Search