Next
सुधीर फडके, गदिमा आणि पुलंच्या आठवणींना उजाळा
प्रभाकर जोग व श्रीकांत मोघे यांचा गौरव
BOI
Saturday, December 15, 2018 | 03:31 PM
15 0 0
Share this article:

‘लेणे प्रतिभेचे’ कार्यक्रमात ज्येष्ठ व्हायोलिन वादक प्रभाकर जोग आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुणे : ज्येष्ठ व्हायोलिनवादक प्रभाकर जोग आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांनी ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, ज्येष्ठ कवी व गीतकार ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ लेखक पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्यामुळेच आपण घडलो अशी नम्र भावनाही व्यक्त केली. निमित्त होते अशोक राठी आणि मनाली भिलारे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘लेणे प्रतिभेचे’ या विशेष कार्यक्रमाचे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जोग आणि मोघे यांना गौरवण्यात आले. या वेळी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत या कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

प्रभाकर जोग म्हणाले, ‘फडके यांच्यामुळेच मी महाविद्यालयात शिकत असतानाच चित्रपट आणि संगीत क्षेत्रात आलो. त्यांच्याकडेच मी घडलो.’ 
पु. ल. देशपांडे यांच्यामुळेच आपली वाऱ्यावरची वरात चालल्याचे श्रीकांत मोघे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘जीवनात अनेक गुरू भेटले, पण त्यांतील श्रेष्ठ गुरू म्हणजे पु. ल. देशपांडे. भाषेची गंमत मला पुलंमुळेच कळाली.’ 

राष्ट्रीय लोक समता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, आमदार मोहन जोशी, आयोजक अशोक राठी व मनाली भिलारे, माजी महापौर अंकुश काकडे, मोहनसिंग राजपाल, माजी आमदार कमल ढोले पाटील, रवींद्र माळवदकर, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे या वेळी उपस्थित होते. 

 या वेळी सुधीर फडके, गदिमा आणि पुलंच्या अजरामर गीतांचा पुन्हा एकदा आनंद घेण्याची संधी ‘लेणे प्रतिभेचे’ या नृत्यसंगीतमय कार्यक्रमाद्वारे रसिकांना मिळाली. ‘संवाद, पुणे’तर्फे हा कार्यक्रम सादर करण्यात आला. 

छगन भुजबळ म्हणाले, ‘ संगीत आणि साहित्याची थोडीफार जण असणाऱ्या प्रत्येकाकडेच पुलं, गदिमा आणि सुधीर फडके यांच्या आठवणी आणि गाणी असणारच. ही महाराष्ट्राची अनमोल रत्ने आहेत.’  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search