Next
सविता कोमलवाडची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
नागेश शिंदे
Thursday, October 25, 2018 | 01:28 PM
15 0 0
Share this article:

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सविता कोमलवाड हिचा सत्कार करताना मान्यवर.

हिमायतनगर : तालुक्यातील मौजे शिबदरा या ग्रामीण भागातील सविता कोमलवाड हिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच विभागीय स्तरावर झालेल्या कुस्ती स्पर्धेत उस्मानाबाद येथून तिने प्रथम पारितोषिक पटकावले होते.

शहरातील राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ती दहावीत शिकत आहे. उस्मानाबाद येथे विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी ४६ किलो वजनी गटात सविताने लातूर व उस्मानाबादच्या दोन मुलींना मागे टाकले होते. तिच्या कामगिरीमुळे तिची राजस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. सविताचे वडील कुस्तीप्रेमी असल्यामुळे तिलाही कुस्तीमध्ये आवड निर्माण झाली. तिने यात्रेतील खुल्या कुस्ती स्पर्धेत सहभागी होत आपल्यातील गुणवत्तेची चुणूक दाखवली.

कुस्ती स्पर्धेसाठी सविताला सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक के. बी. शेनेवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत सविता ४६ किलो वजनी गटात लातूर विभागाचे नेतृत्व करणार आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल राजा भगीरथ शाळेचे मुख्यध्यापक अशोक अंनगुलवार, बी. आर. पवार, जी. डी. कावसे, श्री. उत्तरवार, क्रीडा शिक्षक श्री. शेनेवाड, माधुरी तीप्पनवार, के. आर .दिक्कतवार, श्री. बाचावार, श्री. कोंडामंगल आदींनी तिचा सत्कार केला.

हिमायतनगरचे नाव जिल्हा, विभाग व आता राज्यस्तरापर्यंत नेल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त विठ्ठलराव गुंफलवाड, रमेशराव सागर, जिल्हा परिषद अध्यक्षा शांता पवार, पंचायत समितीच्या माया राठोड, नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपनगराध्यक्ष श्री. मो.जावेद यांसह सर्व नगरसेवक आणि पत्रकारांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Aviraj About 298 Days ago
Super
0
0

Select Language
Share Link
 
Search