Next
‘मोबिक्विकवरून बुक करा ‘ओला’
प्रेस रिलीज
Saturday, May 05 | 02:14 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : भारतामध्ये डिजिटल व्यवहारांकडे भर देण्याच्या शासनाच्या वचनबद्धतेचे पुनरूच्चारण करण्यामध्ये ‘मोबिक्विक’ या भारताच्या अग्रणी डिजिटल वित्तीय सेवा मंचने आणि भारताचा अग्रणी आणि जगामधील राईड-शेअरींग कंपन्यांपैकी एक असलेली ‘ओला’ यांनी अद्वितीय भागीदारीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ‘मोबिक्विक’ युजरना ‘मोबिक्विक’ अ‍ॅपमध्ये भारताच्या ११० शहरांदरम्यान ओला कॅब आणि ऑटो बुक करता येणार आहे.

या भागीदारीसह, ‘मोबिक्विक’ युजरना ‘ओला’च्या परवडण्यायोग्य ओला ऑटो, मायक्रो आणि मिनीसारखे विकल्प ते ओला प्राईम, ओला प्राईम प्ले, ओला प्राईम एसयूव्ही आणि ओला लक्स यासारख्या मल्टी-मॉडेल प्रवासी ऑफरना अ‍ॅक्सेस दिला जाईल.

ग्राहक प्रत्यक्षपणे ओला राईड त्यांच्या मोबिक्विक अ‍ॅपद्वारे बुक करू शकतात आणि अ‍ॅपदरम्यान शफल केल्याशिवाय मोबिक्विक वॉलेटद्वारे पेमेंट करू शकतात. आरंभ ऑफरचा भाग म्हणून ‘मोबिक्विक’ पहिल्या पाच राइडवर ५० रुपये सुपरकॅश ऑफर करत आहे. ‘मोबिक्विक’ यूजर प्रत्येक राईडवर १०० रुपयांपर्यंत सूट मिळवण्यासाठी १० टक्के सुपरकॅशचा वापर करू शकतात; तसेच ‘मोबिक्विक’ दररोज एक हजार युजरना संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत आणि सकाळी आठ ते सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांच्या वॉलेटद्वारे राइड बुक करण्यासाठी १०० टक्के कॅशबॅक मिळवण्याची संधी देत आहेत.

भागीदारीची घोषणा करताना ‘मोबिक्विक’चे मार्केटींग आणि ग्रोथ उपाध्यक्ष दमान सोनी म्हणाले की, ‘डिजिटल पेमेंटसाठी कॅब बुकिंग ही आशाजनक श्रेणी असल्याचे आम्ही मानतो. गेल्या काही महिन्यांमध्ये, आम्हाला ग्राहकांकडून आमच्या अ‍ॅपवर स्मार्ट मोबिलिटी सक्षम करण्याच्या विनंती येत आहेत. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर ओलासोबत राइड बुकिंग करण्यासाठी रिच इंटरफेस सक्षम केला आहे आणि येणार्‍या कालावधीमध्ये शीर्षस्थानच्या प्रदर्शन करणार्‍या श्रेणींपैकी हे एक असेल असा विश्वास आम्हाला आहे. आम्ही डिजिटल व्यवहार सोपे आणि सुव्यवस्थित करण्यास वचनबद्ध आहोत. या प्रयत्नामध्ये ओला हा प्रमुख भागीदार आहे.’

भागीदारीवर बोलताना ‘ओला’चे अलायन्स हेड सौरभ मिश्रा म्हणाले की, ‘धोरणात्मक भागीदारी ग्राहक अनुभव समृद्ध करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. सेवांचे एकत्रीकरण केल्यास त्यामुळे ग्राहकांचे सशक्तीकरण होते, त्यांचे जीवन सोपे आणि सोयीचे होते. या भागीदारीद्वारे, मोबिक्विक यूजर एक अ‍ॅप वापरून त्यांच्या पसंतीची राइड बुक करू शकतात. अ‍ॅपमधील ओला बुकिंग अनुभवासोबत मोबिक्विक यूजर खूश होतील याचा आम्हाला विश्वास आहे.’

भारत शासनाने वर्तमान आर्थिक वर्षामध्ये ३० बिलियन व्यवहारांचे मोठे लक्ष्य निश्चित केले आहे, ज्यात मोबाइल वॉलेटद्वारे ६.३ बिलियन व्यवहार होणे अपेक्षित आहे. अशा युती देशामधील डिजिटल व्यवहारांच्या वाढीसाठी आवश्यक उत्तेजना पुरवतात. ‘ओला कॅब’ हे ‘मोबिक्विक’ अ‍ॅपच्या नवीनतम आवृत्तीवर, फक्त अँड्रॉईड युजरसाठीच उपलब्ध आहे.

‘मोबिक्विक’विषयीः
‘मोबिक्विक’ हे भारतातील सर्वात मोठा डिजिटल वित्तीय सेवा मंच, एक प्रमुख मोबाइल वॉलेट आणि आघाडीचे पेमेंट गेटवे आहे. मोबिक्विक ॲप हा सुमारे तीन दशलक्ष थेट व्यापारी आणि २६० दशलक्षपेक्षा अधिक युजरचे विस्तृत जाळे असलेले आघाडीचा मोबाईल पेमेंट मंच आहे. बिपिन प्रीत सिंह आणि उपासना टाकू यांनी सन २००९मध्ये कंपनीची स्थापना केली असून, कंपनीने सेक्वाया कॅपिटल, अमेरिकन एक्स्प्रेस, ट्री लाईन एशिया, मीडियाटेक, जीएमओ पेमेंट गेटवे, सिस्को इन्व्हेस्टमेंट्स नेट१ आणि बजाज फायनान्स यांकडून चार फेरींचा निधी उभारला आहे.
 
सन २०१७मध्ये ‘मोबिक्विक’ने बीएसएनएल, बजाज फिनसर्व्ह लिमिटेड आणि इंडसइंड बँक यासारख्या आघाडीच्या ब्लू-चिप ब्रँडसह एक लघु भागीदारी सुरू केली आहे. तेव्हापासून जवळपास २६० दशलक्ष भारतीयांनी त्याचा लाभ घेतला आहे. ऑगस्ट २०१७मध्ये, ‘बीएसएनएल’ने बीस्पोक मोबाईल वॉलेट सुरू करून डिजिटल क्षेत्रात आणखी एक पाऊल टाकले, जे वॉलेट ‘मोबिक्विक’द्वारे विकसित आणि पारीत करण्यात आले आहे.

अलीकडेच, कंपनीने बजाज फिनसर्व्हसह भागीदारी करून भारताचे पहिले क्रेडिट वॉलेट सुरू केले आहे. बजाज फिनसर्व्ह-मोबिक्विक वॉलेट हे भारताचे पहिले क्रेडिट वॉलेट आहे. यासह ‘मोबिक्विक’ने भारताचे पहिले ऑटो-लोड वॉलेट तयार केले असून, ज्याचा लाभ इंडसइंड बँकचे १० दशलक्षपेक्षा अधिक ग्राहक घेऊ शकतात. त्यांना फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे खरेदी करण्यासाठी त्यांना त्यांच्या वॉलेटवर टॅप करायचे आहे आणि त्यांच्या इंडसइंड अकाउंटमधून स्वयंचलितपणे पैसे वजा होतील, तसेच कंपनीने व्हर्च्युअल कार्डसाठी ‘आयडीएफसी’ बँकसह करार केला आहे.

कंपनीची नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे आणि कोलकाता येथे कार्यालये आहेत. ‘मोबिक्विक’ भारतातल्या डिजिटल व्यवहाराचा सर्वात मोठा स्त्रोत असण्याची शक्यता आहे. हे भोपाळ प्लस, बंगळुरू वन, जीएसआरटीसी, अमूल, वेरका, मदर डेअरी, सफल, एनएचएआय, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल, अमूल, वेरका, आयआरसीटीसी, उबर, मेरु कॅब्स, बिग बाजार, ओयो रुम, झोमॅटो, पीव्हीआर, आर्चिस, डब्ल्यूएचस्मिथ इंडिया, बुकमायशो, ग्रोफर्स, बिग बास्केट, डोमिनोज, बर्गर किंग, पिझ्झा हट, ईबे, शॉपक्लूज, मिंत्रा, जेबॉन्ग, पेपरफ्राय, बरिस्टा, फूड पांडा, निअरबाय, व्हॅन ह्यूसेन, ॲलन सॉली, लुईस फिलिप्स, गोडॅडी, मेकमायट्रीप यासाठी ई-पेमेंटसाठी समर्थित आहे. कंपनीने ‘बीएसएनएल’सह भागीदारी केली आहे. यातून सुमारे १२० दशलक्ष ग्राहकांसाठी को-ब्रँडेड मोबाईल वॉलेट बनवण्यात येतील.

‘ओला’विषयी :
भाविश अग्रवाल आणि अंकीत भाटी यांच्याद्वारे २०११मध्ये स्थापित ‘ओला’ ही जगामधील सर्वाधिक राइड-शेअरिंग कंपन्यांपैकी एक बनली आहे. ‘ओला’ मोबाईल टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्मवर ग्राहक आणि ड्रायव्हर-भागीदारांसाठी शहराच्या वाहतुकीला एकीकृत करते, सोयीच्या, पारदर्शी आणि त्वरित सेवा पूर्णतेची खात्री देते. ‘ओला’ ही तंत्रज्ञानामधील उत्तम गोष्टींचा फायदा घेणे आणि जागतिक श्रेणीवर संबंधित असलेली नवीनतम सोल्यूशन ग्राऊंड-अप उभारण्यासाठी केंद्रीत आहे.

२०१६मध्ये ओला प्ले राइड शेअरिंगसाठीचा जगामधील पहिला कनेक्टेट कार प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला, ज्यामुळे प्रवासी अनुभवामध्ये रूपांतरण झाले आणि या क्षेत्रामध्ये जागतिक नवप्रवर्तनाची निश्चिती झाली. राइडदरम्यान अत्यंत वैयक्तिक अनुभव युजरला ऑफर करण्यापलीकडे, ओला प्ले हा इतरांसोबतच मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल म्युझिक, सोनी लाईव्ह यांनाही त्यांच्या युजरसाठी उच्च गुणवत्ता संवादी आणि उत्पादक अनुभव निर्माण करण्यास परवानगी देतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link