Next
ठाण्यात वार्षिक राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेचे आयोजन
प्रशांत सिनकर
Saturday, December 29, 2018 | 11:03 AM
15 0 0
Share this article:

ठाणे : जिल्हा ब्रिज असोसिएशन व आर्य क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाच व सहा जानेवारी २०१९ रोजी राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ठाण्यातील आर्य क्रीडा मंडळ येथे टीम ऑफ फोर, तसेच पेअर्स पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत राज्यभरातून अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत.

नुकत्याच झालेल्या एशियाड ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून कांस्यपदक पटकावणारे राजू तोलानी व अजय खरे यांचा विशेष सत्कार या वेळी केला जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन पाच जानेवारीला सकाळी होईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू व प्रतिनिधींच्या चहा, नाश्ता व भोजनाचीही व्यवस्था केली आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून, बक्षीस समारंभ सहा जानेवारीला सांयकाळी होणार आहे. बक्षीस समारंभानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
अनिरुद्ध संझगिरी :
९८१९२ ६७४५७
श्री. दक्षिणदास : ९००४० २२०८२
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search