Next
‘काव्यात्मक ‘अस्वस्थता’ विचार करायला लावणारी’
प्रेस रिलीज
Thursday, February 01 | 01:26 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘वाचनसंस्कृती लोप पावत असताना मनातील अस्वस्थता काव्यातुन सातत्यपूर्ण मांडत राहण ही सोपी गोष्ट नाही. परिस्थिती अन संघर्ष हे समीकरण सोबतीला असणाऱ्या विक्रमने लिहिलेला काव्यसंग्रह नक्कीच रसिकांना अस्वस्थतेतूनही नवीन ऊर्जा मिळवून देईल,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

येथील मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य शाखेतील ज्ञानदेव सभागृहात कवी विक्रम शिंदे यांच्या ‘अस्वस्थ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे सचिव भाऊसाहेब जाधव, प्रसिद्ध साहित्यिक प्रदीप आवटे, जाणीव जागृती फाउंडेशनचे अवधूत बागल आदी उपस्थित होते.

‘स्त्री-पुरुष समानतेचे मूर्तिमंत रूप त्याने आईचा नामोल्लेख करून दाखवून दिले आहे. प्रेम, संघर्ष, विचार, व्यक्ती, तत्त्वज्ञान अशा सर्वच विषयांना विक्रमने न्याय दिला असून, काव्यात्मक अस्वस्थता मांडण्याचा त्याचा प्रयत्न विचार करायला लावणारा आहे,’ असे डॉ. सबनीस म्हणाले.

अध्यक्षस्थानी असणाऱ्या प्रदीप आवटे यांनी त्यांच्या दिलखुलास शैलीत रसिकांशी गप्पा मारल्या. ‘कविता सुचणे अवघड नाही; पण ती भावना जगणे अवघड आहे. स्तुती केलेली कविता प्रत्येकवेळी चांगली असेलच असे नाही. कवीने मात्र स्वतःचे परिक्षण करून त्या भावनेला न्याय द्यावा,’ असे आवटे म्हणाले.

या वेळी आयोजित काव्य संमेलनात अंकुश आरेकर, सचिन आशा सुभाष, अवधूत बागल, कुलदीप आंबेकर, विक्रम शिंदे, नितीन जाधव यांनी प्रेम,दुःख, अगतिकता, माणूस, जात निर्मूलन, भोवताल या विषयावर कविता सादर केल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link