Next
..आणि ‘डेक्कन क्वीन’ची चालक झाली महाराणी
महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेचा विशेष उपक्रम; रेल्वेचे कामकाज आज महिलांकडे
BOI
Friday, March 08, 2019 | 04:41 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महिलांसाठी आव्हान असलेल्या रेल्वे खात्यातही आज सर्व स्तरावर महिला दिसून येतात. या खात्यातील महिलांच्या कामाची नोंद घेतली जावी या उद्देशाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेने जागतिक स्तरावर गाजत असलेल्या ‘डेक्कन क्वीन’ या रेल्वेचे एका दिवसाचे कामकाज महिलांवर सोपवण्याचा उपक्रम केला आहे. त्यामुळे आज राणीला चक्क महाराणीने चालवल्याचा आनंद प्रवाशांना मिळाला आहे.   

आज सर्वच क्षेत्रांत महिला स्वत:चे स्थान सिद्ध करत असताना काही क्षेत्रांमध्ये मात्र अजूनही पुरुषांचे वर्चस्व असल्याचे दिसते. रेल्वे खाते हे त्याचे एक उदाहरण म्हणता येईल. आता हळूहळू रेल्वेतही विविध पदांवर पुरुषांबरोबरच महिलाही आपले स्थान निर्माण करताना दिसत आहेत. महिलांच्या या कामाची नोंद घेण्यासाठी आज महिला दिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेने हा अनोखा उपक्रम राबवला आहे. 

या उपक्रमांतर्गत ‘डेक्कन क्वीन’ ही जागतिक स्तरावर गाजणारी रेल्वे आज रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून पुण्याहून मुंबईला घेऊन जाण्यात आली आहे. या रेल्वेची सर्व जबाबदारी आज महिलांकडेच असणार आहे. त्यामुळे आज राणीला चक्क महाराणी ने चालवले, असा अनुभव रेल्वे प्रवाशांना येत आहे.  आणखी एक विशेष बाब म्हणजे तिकिट तपासनीस म्हणूनही पुणे स्टेशन विभागातील महिला कर्मचारी काम करत आहेत. तसेच डेक्कन क्वीनमध्ये असणाऱ्या पुरुष पोलिसांच्या जागीही आज रेल्वे पोलिस फोर्स (आरपीएफ)च्या महिला कार्यरत आहेत. 

लोको पायलट श्रद्धा तांबे असून, जयश्री कांबळे असिस्टंट लोको पायलट आहेत. गार्ड राधा चलवादी आणि पॉइंट्समन सरिता ओव्हाळ, गुड्डी मीना आणि नम्रता दोंदे यांचाही या टीममध्ये समावेश होता.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search