Next
‘बैजू बावरा’च्या रिमेकमध्ये शाहरुख-सलमान एकत्र?
संजय लीला भन्साळींचा आणखी एक बिग बजेट चित्रपट
BOI
Saturday, March 16, 2019 | 05:57 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : १९५२मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट ‘बैजू बावरा’ पुन्हा एकदा आजच्या पिढीसमोर आणण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सज्ज झाले आहेत. ‘बैजू बावरा’ चित्रपटाचा रिमेक बनवण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. विशेष बाब म्हणजे बॉलीवूडचे दोन सूपरहिरो शाहरुख खान आणि सलमान खान या चित्रपटात एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सलमान खान आणि शाहरुख खान या दोन्हीही बड्या स्टार्सचे प्रचंड चाहते आहेत. त्यामुळे हे दोघे खरेच या चित्रपटात एकत्र दिसले, तर ती त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असेल. ‘बैजनाथ’, ‘बैजू’ आणि ‘बैजू-तानसेन’ अशा नावांनी आधीच संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटाची नोंदणी केलेली असून संजय, शाहरुख आणि सलमान या तिघांना एकत्रित घेऊन हा चित्रपट करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. 

याआधी २०१०मध्ये दिग्दर्शक कृष्णा शाह यांनी ‘बैजू-बावरा’चा रिमेक बनवण्याचे ठरवले होते. त्यासाठी ‘बैजू-दि जिप्सी’ या नावाने त्यांनी नोंदणीही केली होती. मुख्य कलाकार म्हणून आमीर खान भूमिका करणार होता, तर ए. आर. रेहमान यांनी चित्रपटासाठी संगीत देण्याचे ठरले होते, मात्र पुढे काही कारणांमुळे या चित्रपटाचे काम सुरू झाले नाही आणि हा चित्रपट झाला नाही. 

अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांनीही यापूर्वी संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम केले आहे. सलमानचा ‘हम दिल दे चुके सनम’ आणि शाहरुखचा ‘देवदास’ हे त्यांपैकी सुपरहिट ठरलेले चित्रपट. पुन्हा एकदा हे दोघे एकत्र दिसणार का..? आणि या दोघांना एकत्र आणण्यात भन्साळी यांना यश येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search