Next
देणे प्राणेशाचे
BOI
Thursday, January 31, 2019 | 10:12 AM
15 0 0
Share this article:

आपली भारतभूमी ही संत-सत्पुरुषांची भूमी म्हणून ओळखली जाते. येथील संत-सत्पुरुषांनी केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांत अलौकिक योगदान दिले आहे; पण अनेक सत्पुरुष हे त्या-त्या प्रांतापुरते अथवा समाजापुरते, अनुयायांपुरते मर्यादित राहतात. त्यांचे चरित्र, विचार, योगदान मुख्य प्रवाहात येतेच असे नाही. अशा दुर्लक्षित झालेल्या अनेक सत्पुरुषांपैकी एक म्हणजे श्री मध्वाचार्य. अनेक क्षेत्रांत अद्वितीय असे योगदान देऊनही त्यांच्याबद्दल फारशी माहिती मराठी जनांना नाही. याच अनुषंगाने भारतीय प्राचीन आचार्य परंपरेमधील दक्षिणेतील एक प्रमुख मताचार्य श्रीमध्वाचार्य (इसवी सन १२३८-१३१७) यांचे समग्र जीवनचरित्र, कार्य, योगदान यांचा मागोवा ‘देणे प्राणेशाचे’ या पुस्तकातून घेण्यात आला आहे. त्यांच्याविषयीचे सर्वसमावेशक असे हे पहिलेच पुस्तक असून, आचार्यांविषयी जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहे. हे पुस्तक नक्कीच संग्राह्य आहे.

कर्नाटकातील उडुपी ही छोट्या वासुदेवाची जन्मभूमी. वडिल पंडित असल्याने त्यांची प्रवचने होत असत. अशाच एका प्रवचनातून वासुदेवाने वडिलांची चूक सुधारली. पुढे गुरु अच्युतप्रज्ञ यांचेही म्हणणेही त्याने खोडले. त्या काळातील अनेक पंडितांना कालांतराने आचार्य त्रिकालज्ञानी असल्याची खात्री पटली. मध्वाचार्यांचे तत्वज्ञान भारतभर पोचले. सत्य हे शोधावे लागते. त्यासाठी दुराग्रही न राहता सर्व पातळीवर ते तपासून घेण्याची गरज असते. असा मंत्र देत मध्वाचार्यांनी वैदिक वाड्.मयाचे सार उघड केले. आचार्यांच्या परंपरेचा महाराष्ट्राशी खूपच जवळचा संबंध आहे; पण मधल्या काही कालखंडात असंख्य कारणांमुळे तो खंडित झाला. त्या सगळ्यांचा विमर्शही प्रस्तुत पुस्तकात केला आहे. आचार्यांच्या जीवन चरित्राबरोबरीने त्यांचे अद्वितीय योगदान, शिष्य-परंपरा, ग्रंथसंपदा या सर्व विषयांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे.


समर्थ रामदासांनी जो धर्म-राष्ट्ररक्षणाचा उपदेश दिला, तोच उपदेश आचार्यांनी १३व्या शतकात दिला होता. सध्याच्या विज्ञानाला माहित झालेल्या अनेक गोष्टींचा खुलासाही आचार्य १३व्या शतकातच करून ठेवतात. संगीत-नृत्य-नाट्य, राजकारण, गिर्यारोहण, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, कवी, संशोधक, भाष्यकार आणि भगवान वेदव्यासांचे अंतरंग शिष्य अशा आचार्यांच्या अनेक पैलूंचे दर्शन वादिराज लिमये यांनी या पुस्तकातून घडवले आहे.

पुस्तक : देणे प्राणेशाचे – श्री मध्वाचार्यांच्या समग्र जीवनाचा घेतलेला मागोवा
लेखक : वादिराज लिमये
प्रकाशक : वादिराज लिमये
पाने : २००
किंमत : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search